बहिणीने खरेदी केला १०० रुपयांचा ड्रेस, संतप्त भावाने फोडले डोळे

रक्षाबंधनाला अवघे काही तास शिल्लक असतानाच एक दुख:द आणि भयानक घटना समोर आली आहे. बहिणीने १०० रुपयांचा ड्रेस खरेदी केल्याने संतप्त झालेल्या भावाने तिचे डोळे फोडले आहेत. ही घटना देशाची राजधानी दिल्लीत घडली आहे.

brother attacked on sister
पीडित मुलगी 

थोडं पण कामाचं

  • रक्षाबंधनापूर्वी भावाने बहिणीचे फोडले डोळे
  • १०० रुपयांचा ड्रेस खरेदी केल्याने भाऊ झाला संतप्त
  • संतप्त भावाने आपल्या मोठ्या बहिणीला मारहाण करत फोडले डोळे
  • आरोपी भाऊ हा बहिणीपेक्षा तीन वर्षांनी लहान

नवी दिल्ली: रक्षाबंधन... या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीच्या संरक्षणाची शपथ घेतो. यंदाच्या वर्षी रक्षाबंधन १५ ऑगस्ट रोजी आहे. रक्षाबंधनाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या बहिणीने १०० रुपयांचा ड्रेस खरेदी केल्याने संतप्त झालेल्या भावाने बहिणीला मारहाण केली आणि त्यानंतर तिचे डोळे फोडले. ज्या परिवारात ही घटना घडली आहे तो परिवार बिहारमधील असून दिल्लीतील द्वारकाजवळ सध्या राहत आहे. मंगळवारी दिल्ली महिला आयोगाचं एक पथक नियमित तपासणी करत होतं त्यावेळी हा प्रकार समोर आला. महिला आयोगाच्या पथकाने २० वर्षीय पीडित मुलीला बचावले.

दिल्ली महिला आयोगाचं पथक परिसरात डोअर-टू-डोअर नियमित विझिट करत होतं. त्याच दरम्यान या पथकातील महिलांनी मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला. यावेळी महिला आयोगाच्या पथकातील महिला पीडित मुलीच्या घरी दाखल झाल्या. यावेळी त्या पीडित मुलीच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, तिचा भाऊ नेहमीच मारहाण करतो आणि शिव्या देतो. 

या घटनेची माहिती मिळताच दिल्ली महिला आयोगाच्या पंचायत टीमने आयोगाच्या कार्यालयात फोन केला आणि पीडित मुलीच्या बिहारमधील घरी सुद्धा माहिती दिली. ज्यावेळी या पथकातील महिलांनी पीडित मुलीच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने त्या महिलांनाही शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर हल्ला करण्याची धमकी दिली. मात्र, त्या मुलाला न घाबरता महिलांनी पीडित मुलीच्या घरात प्रवेश केला. पीडित मुलगी ही जमिनीवर पडलेली होती, तिच्या चेहऱ्यावर अनेक जखमा होत्या. दुखापत झाल्यानंतरही तिच्यावर कुठल्याही आरोग्य सुविधा भावाने उपलब्ध करुन दिली नव्हती.

या पीडित मुलीला उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीडित मुलीची प्रकृती अतिशय गंभीर आहे. डॉक्टरांनी सांगितले की, पीडित मुलीच्या चेहऱ्यावर आलेली सूज कमी होण्याची वाट पाहत आहोत त्यानंतरच तिच्या डोळ्यांना किती नुकसान झालं आहे आणि काय उपाय करता येतील याचा अंदाज येईल. दिल्ली महिला आयोगाच्या स्वाति मालिवाल यांनी सुद्धा सफदरजंग रुग्णालयात पीडित मुलीची भेट घेतली.

स्वाति मालिवाल यांनी ट्विट करत म्हटलं, '१०० रुपयांचा ड्रेस घेतल्याने १७ वर्षीय भावाने बहिणीचे दोन्ही डोळे फोडले. दिल्ली महिला आयोगाचं पंचायत पथक परिसरात विझीट करत असताना घडलेला प्रकार समोर आला. मी रुग्णालयात पीडित मुलीची भेच घेतली. तिची प्रकृती चिंताजनक आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी जल्लाद भावाचं हे असं कसं गिफ्ट?'

महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांसोबतही संपर्क केला आहे. पीडित मुलीचे आई-वडिल बिहारमध्ये आहेत आणि घटनेची माहिती मिळताच आता दिल्लीला येणार आहेत. महिला आयोगाने म्हटलं की, 'हे पहिल्यांदाच घडलेलं नाहीये, आरोपी मुलगा आपल्या बहिणीसोबत असा दुर्व्यवहार करत असतो आणि आपल्या दोन्ही भाऊ-बहिणीला मारहाण करत असतो. आरोपीच्या आठ वर्षीय बहिणीने कथित स्वरुपात आयोगाला सांगितले की, तिच्या मोठ्या बहिणीवर हल्ला करण्यापूर्वी एक दिवसआधी त्याने माझ्यावर हल्ला केला होता, मला चावण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे व्रण सुद्धा हातांवर स्पष्ट दिसत आहेत'.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बहिणीने खरेदी केला १०० रुपयांचा ड्रेस, संतप्त भावाने फोडले डोळे Description: रक्षाबंधनाला अवघे काही तास शिल्लक असतानाच एक दुख:द आणि भयानक घटना समोर आली आहे. बहिणीने १०० रुपयांचा ड्रेस खरेदी केल्याने संतप्त झालेल्या भावाने तिचे डोळे फोडले आहेत. ही घटना देशाची राजधानी दिल्लीत घडली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
पंतप्रधान मोदींच्या न्यू यॉर्क भेटीत अडचण आणण्यासाठी हा प्लान करत आहे पाकिस्तान 
पंतप्रधान मोदींच्या न्यू यॉर्क भेटीत अडचण आणण्यासाठी हा प्लान करत आहे पाकिस्तान 
ज्या इमारतीचं उद्घाटन केलं तिथेच आरोपी म्हणून आले चिदंबरम! 
ज्या इमारतीचं उद्घाटन केलं तिथेच आरोपी म्हणून आले चिदंबरम! 
Donald Trump On Kashmir: काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांना चिंता; मध्यस्थीची तयारी
Donald Trump On Kashmir: काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांना चिंता; मध्यस्थीची तयारी
उत्तराखंड :  पूरग्रस्त भागात मदत सामुग्री घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात, २ जण ठार 
उत्तराखंड :  पूरग्रस्त भागात मदत सामुग्री घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात, २ जण ठार