Chhattisgarh: सुकमा येथे CRPF जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर केला गोळीबार, चार ठार, तीन जखमी रुग्णालयात

Firing Chhattisgarh crpf camp : छत्तीसगडमधील सुकमा येथे एका CRPF जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार जवानांचा जागीच मृत्यू झाला.

breaking news 4 crpf jawans killed in fratricide in chhattisgarhs crpf camp in maraiguda police station
सुकमा येथे CRPF जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर केला गोळीबार 
थोडं पण कामाचं
  • छत्तीसगडमधील सुकमा येथे सीआरपीएफ (CRPF)जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला
  • चार जवान शहीद, तीन जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
  • गोळीबाराच्या घटनेचा उलगडा होऊ शकला नाही, पोलीस तपासात गुंतले

Firing Chhattisgarh crpf camp । सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कॅम्पमध्ये ((Chhattisgarh CRPF Camp))एका जवानाने आपल्या साथीदारांवर गोळीबार केला, यात चार जवान जागीच ठार झाले. मिळालेल्या वृत्तानुसार, गोळीबारात आणखी तीन जवान जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी जवान सीआरपीएफ 50 बटालियनचे आहेत. धनजी, राजीव मंडल आणि राजमणी कुमार यादव अशी मृत झालेल्या जवानांची नावे आहेत. (breaking news 4 crpf jawans killed in fratricide in chhattisgarhs crpf camp in maraiguda police station)

CRPF दिली माहिती

बातमीनुसार, आरोपी जवान नाईट ड्युटीवर होता. आरोपीने हे भयंकर पाऊल का उचलले याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या घटनेचे शोक व्यक्त करताना सीआरपीएफने सांगितले की, "जवान रितेश रंजनने मरीगुडा पोलिस स्टेशन अंतर्गत लिंगापल्ली येथे तैनात असलेल्या आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केला ज्यामध्ये 7 जखमी जवानांना तातडीने भद्राचलम रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे पोहोचल्यावर तिघांना मृत घोषित करण्यात आले.

यापूर्वीही घटना घडल्या

यापूर्वीही सीआरपीएफ कॅम्पमध्ये अशा गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. जवान कोणत्याही डिप्रेशनमध्ये होता की त्याच्या सहकाऱ्यांसोबत वाद झाला होता, प्रत्येक कोनातून तपास केला जात आहे. पोलीस आरोपी जवानाला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. ही घटना आज पहाटे ४ वाजताची आहे. ज्या भागात ही घटना घडली तो सुकमाचा अगदी अंतर्गत भाग आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी