मुंबई : गुजरात (Gujarat)राज्यातील भावनगरमध्ये (Bhavnagar)एका लग्न समारंभात ( wedding ceremony)एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्न समारंभ चालू असतानाच नववधूचं हृदयविकारच्या झटक्याने(heart Attack) निधन झालं. भावनगरमधील सुभाषनगर (Subhashnagar) येथे हा लग्न समारंभ पार पडत होता. परंतु नवरीच्या निधनामुळे सुखाचं क्षणावर दुखाचे विरजन आलं. (bride dies of heart attack while performing wedding ritual; Family Replaces Her with Younger Sister)
अधिक वाचा : जॉनच्या किसमुळे कंगनाचं झालं मोठं नुकसान; कंट्रोल जॉन कंट्रोल
या मृत वधूचे नाव हेतल असं आहे, तिचं लग्न विशाल नावच्या मुलाशी लग्न होत होतं. जिनाभाई राठोड यांची मुलगी हेतल आणि राणाभाई बुताभाई अलगोतार यांचा मुलगा विशाल हे नवीन आयुष्याचे स्वप्न डोळ्यात घेत एकमेंकाचे साथीदार होणार होते. आपल्या आयुष्यातील सर्वात सुखाचे क्षण अनुभवत होते. लग्न मंडप पाहुण्यांनी भरलेला होता. सर्वत्र जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण होतं. परंतु त्यांच्या या सुखावर दुखाचे विरजन आले.
अधिक वाचा : प्रेमासाठी कुमार विश्वासनं घराच्यांसोबत केलं होतं भांडण
विशाल आणि हेतल यांचा विवाह भावनगर येथील भागवानेश्वर महादेव मंदिरात पार पडत होता. लग्नाचे विधी सुरू असतानाच हेतलला अस्वस्थ वाटू लागले. चक्कर आल्यामुळे ती खाली कोसळली. हेतल खाली पडल्याचं पाहुण नातेवाईकांनी तिला रुग्णालयात नेलं, परंतु तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. हेतलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं डॉक्टर म्हणाले.
अधिक वाचा :काळा चहा आहे गुणकारी, रिकाम्या पोटी प्यायल्याने होतात अनेक फायदे
हेतलच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच नातेवाईकांनी धाकट्या बहिणीच्या लग्नाचा पर्याय सुचवला. हेतलच्या धाकट्या बहिणीने ताईची जागा घ्यावी आणि विशालसोबत बोहल्यावर चढावं, लग्नाचे विधी पूर्ण करावेत, असं नातेवाईकांनी सांगितलं. जड अंतःकरणाने वधूमाता आणि वधूपित्याने हा निर्णय घेतला. हेतलची धाकटी बहीणही तयार झाली. लग्नविधी पूर्ण होईपर्यंत हेतलचा मृतदेह शवागरात ठेवण्यात आला.