वरात दारातून परत... दारूच्या नशेत लग्नाला आलेल्या नवरदेवाला नवरीचा नकार!

लोकल ते ग्लोबल
Updated May 09, 2019 | 15:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

आपल्या जोडीदाराची निवड करण्याचा अधिकार प्रत्येक तरुणीला असतो. याच अधिकाराचा वापर करत एका नवरीनं दारात आलेल्या नवरदेवासोबत लग्न करण्यास नकार दिला. पण नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...

Bride
दारुड्या नवरदेवाला नवरीचा नकार  |  फोटो सौजन्य: Representative Image

गाझियाबाद: लग्न मोडणं हे समाजात खूप वाईट समजलं जातं. खासकरून एखाद्या मुलीचं लग्न मोडलं तर त्याला सर्वस्वी तिलाच दोषी धरलं जातं. पण आपला जोडीदार निवडायचा अधिकार प्रत्येक तरुणीला आहे. गाझियाबादमध्ये एक अशीच घटना समोर आली आहे. तिथं लग्नासाठी दारात आलेली वरात नवरीनं परत पाठवली आणि लग्न मोडलं. लग्न मोडण्याचं कारणही तसंच धक्कादायक आहे. आपल्या लग्नात नवरदेव स्वत: दारूच्या नशेत होता. लग्नासाठी त्याला स्टेजवर साधं उभंही राहता येत नव्हतं.

त्यामुळं नवरीनं अशा दारूड्या मुलासोबत लग्न करण्यास स्टेजवरच थेट नकार दिला. त्यानंतर तिथं थोडसं वातावरण तापलं. मात्र पाहुण्यांमध्ये उपस्थित असलेल्या तरुणानं या नवरीसोबत लग्न करण्याची तयारी दर्शवली आणि सगळं काही ठीक झालं.

जाणून घ्या काय घडलं नेमकं...

गाझियाबादच्या ट्रॉनिका सिटी इथलं एक प्रकरण आहे. इथल्या कॉलनीमध्ये बुधवारी एका घरात लग्न होतं. दिल्लीतील रोहिणी परिसरातून वरात गाझियाबादच्या ट्रॉनिका सिटीतील कॉलनीत आली. घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. आलेल्या वरातीचं नवरी मुलीच्या कुटुंबीयांनी एकदम थाटात स्वागत केलं. पण नवरदेव स्टेजवर पोहोचला आणि ते पाहून नवरीचं डोकंच भणभणलं. नवरदेव पूर्णपणे दारूच्या नशेत होता. त्याला स्टेजवर साधं उभंही राहता येत नव्हतं. त्यामुळं नवरदेवाला अशा परिस्थितीत पाहून तिथं उपस्थित सर्वच वऱ्हाडी थक्क झाले होते. नवऱ्या मुलीला तर फारच चीड येत होती. त्यामुळं हे सर्व पाहून नवऱ्या मुलीनं लग्नाला थेट नकार दिला आणि आपण या मुलाशी लग्न करणार नसल्याचं जाहीर करून टाकलं.

नवऱ्या मुलीचा हा निर्णय ऐकून तिथं उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र नवऱ्या मुलीच्या या निर्णयाला तिच्या कुटुंबीयांनी म्हणजेच आईवडीलांनी देखील पाठिंबा दिला आणि वरात परत पाठवली. मात्र आपल्या मुलीचं लग्न मोडल्यानं तिचे आई-वडील चिंताग्रस्त झालेले असतांना तिथं पाहुण्यांमध्ये उपस्थित एक तरुण पुढे आला आणि त्यानं आपण नवऱ्या मुलीसोबत लग्न करण्यास तयार असल्याचं सांगितलं. त्याचा हा पुढाकार पाहून नवरीच्या आई-वडिलांनी तरुणाच्या कुटुंबीयांची सहमती घेतली आणि मग थाटात त्या दोघांचं लग्न लावून दिलं.

गाझियाबादमधील ही घटना म्हणजे अशा तरुणांसाठी एक उदाहरण आहे, जे लग्न ठरलं आता आपण काहीही करू शकतो हा विचार करतात किंवा मुलीकडील लोकांना गृहीत धरतात. तरुणीनं उचललेल्या पावलाचं सर्वत्र कौतुक होतं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
वरात दारातून परत... दारूच्या नशेत लग्नाला आलेल्या नवरदेवाला नवरीचा नकार! Description: आपल्या जोडीदाराची निवड करण्याचा अधिकार प्रत्येक तरुणीला असतो. याच अधिकाराचा वापर करत एका नवरीनं दारात आलेल्या नवरदेवासोबत लग्न करण्यास नकार दिला. पण नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
पॉर्न सिनेमा पाहून तसेच कृत्य करणं बेतलं जीवावर, तरुणाचा मृत्यू
पॉर्न सिनेमा पाहून तसेच कृत्य करणं बेतलं जीवावर, तरुणाचा मृत्यू
[VIDEO]: दिल्लीतील एम्स रुग्णालयाला लागलेली भीषण आग अखेर आटोक्यात
[VIDEO]: दिल्लीतील एम्स रुग्णालयाला लागलेली भीषण आग अखेर आटोक्यात
UNSC: पाक पुन्हा फेल, UNमध्ये पाकिस्तान सपशेल तोंडावर आपटलं
UNSC: पाक पुन्हा फेल, UNमध्ये पाकिस्तान सपशेल तोंडावर आपटलं
Arun Jaitley Health Updates: अरूण जेटली यांची प्रकृती चिंताजनक; अमित शहा, योगी एम्समध्ये दाखल
Arun Jaitley Health Updates: अरूण जेटली यांची प्रकृती चिंताजनक; अमित शहा, योगी एम्समध्ये दाखल
पाकिस्तानकडून LoCजवळ पुन्हा गोळीबार, पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त
पाकिस्तानकडून LoCजवळ पुन्हा गोळीबार, पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ ऑगस्ट २०१९: LoC जवळ गोळीबार ते एम्स रुग्णालयाला आग
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ ऑगस्ट २०१९: LoC जवळ गोळीबार ते एम्स रुग्णालयाला आग
[VIDEO]: भारतविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या पाक समर्थकांना भिडल्या भारताच्या शाझिया इल्मी
[VIDEO]: भारतविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या पाक समर्थकांना भिडल्या भारताच्या शाझिया इल्मी
Artical 370: जम्मू काश्मीरमध्ये 2G इंटरनेट सेवा सुरू, सोमवारपासून शाळा,कॉलेज होणार सुरू
Artical 370: जम्मू काश्मीरमध्ये 2G इंटरनेट सेवा सुरू, सोमवारपासून शाळा,कॉलेज होणार सुरू