सुलतानगंज : सुलतानगंजमधील (Sultanganj) एका बांधकाम सुरू असलेल्या रस्त्याच्या पुलाचा भाग कोसळण्यासाठी (Bridge Collapsed) जोरदार वारा जबाबदार, असल्याचं उत्तर भारतीय प्रशासकीय सेवेतील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने (Senior IAS Offier) दिले आहे. अधिकाऱ्याच्या या उत्तराने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) आश्चर्यचकित झाले. या अधिकाऱ्याचे उत्तर आश्चर्यचकित करणारे आहे, असे सोमवारी गडकरी यांनी सांगितले.
29 एप्रिल रोजी सुलतानगंज येथील गंगा नदीवर बनवण्यात येत असलेल्या पुलाचा एक हिस्सा वादळादरम्यान कोसळला. या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. गडकरी यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगितले की, बिहारमध्ये 29 एप्रिलला एक पूल कोसळला होता. त्याच्या सेक्रेटरीला याचे कारण विचारले असता त्यांनी उत्तर दिले की हे जोरदार वारा आणि वादळामुळे झाले.
यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्चर्य व्यक्त केले. एका आयएएस अधिकाऱ्याने दिलेल्या स्पष्टीकरणावर विश्वास कशाप्रकारे करू शकतो? गडकरी यांनी सांगितले की, मला कळत नाही आहे की, हवा आणि वादळामुळे पूल कसा कोसळू शकतो? नक्कीच यामध्ये काही चूक झाली असेल यामुळे हा पूल कोसळला, असे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
दरम्यान मंत्री नितीन गडकरी यांनी गुणवत्तेशी तडजोड न करता पुलांच्या बांधकामाचा खर्च कमी करण्याच्या गरजेवर भर दिला आहे. परंतु बिहारमधील सुलतानगंज आणि अगुआनी घाट दरम्यानच्या या पुलाचे काम 2014 साली सुरू झाले. त्याचे बांधकाम 2019 मध्येच पूर्ण होणार होते. मात्र, अद्यापही ते पूर्ण झालेले नाही.