बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन येत्या 11 ऑगस्टपासून न्यू जर्सीत

जगभरातील मराठी बांधव ज्या अधिवेशनाची आतुरतेने वाट पाहतात ते मराठी मनाला जोडणारे बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर अटलांटिक शहर न्यू जर्सी येथे 11 ते 14 ऑगस्टदरम्यान आयोजित केले जाणार असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी यांनी दिली.

Brihan Maharashtra Mandalay Session 11 Augustla New Jersey
बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन 11 ऑगस्टला न्यू जर्सीत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जगभरातील मराठी बांधव ज्या अधिवेशनाची आतुरतेने वाट पाहतात
  • ते मराठी मनाला जोडणारे बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर अटलांटिक शहर न्यू जर्सी येथे 11 ते 14 ऑगस्टदरम्यान आयोजित केले जाणार
  • ही माहिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी यांनी दिली.

मुंबई : जगभरातील मराठी बांधव ज्या अधिवेशनाची आतुरतेने वाट पाहतात ते मराठी मनाला जोडणारे बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर अटलांटिक शहर न्यू जर्सी येथे 11 ते 14 ऑगस्टदरम्यान आयोजित केले जाणार असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी यांनी दिली.

अधिक वाचा : Congress Protest : महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसचं आज देशव्यापी आंदोलन, पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव


दर दोन वर्षांनी होणारे हे अधिवेशन  कोरोनामुळे गेल्या वर्षी अधिवेशन होऊ शकले नव्हते. जे आता मोठ्या जोशात आणि जल्लोषात साजरे करण्यासाठी बृहन महाराष्ट्र मंडळ सज्ज झाले आहे. चार दिवसीय अधिवेशन मराठी मनाला साद घालणारी एकापेक्षा एक असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे, ज्यात प्रसिद्ध नाटकापासून चर्चासत्रे, पाककृती, नृत्य नाट्य आणि संगीतासंबंधित स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. एवढेच नव्हे तर या अधिवेशनात आपल्या आवडत्या कलाकारांनाही भेटता येणार आहे.  त्याचप्रमाणे मराठी नाट्य आणि संगीतक्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती या अधिवेशनाचे खास आकर्षण असेल. 

अधिक वाचा : Shiv Sena BJP yuti: ठाकरेंनी केली हातमिळवणीची तयारी पण १२ आमदार आणि राणेंमुळे झाली बिघाडी, वाचा नेमकं काय घडलं?

लोकप्रिय मराठी नाटक “आमने सामने” त्याचप्रमाणे सचिन खेडेकर,सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे या आपल्या आवडत्या कलाकारांचे कार्यक्रम बघण्याची संधी  रसिकांना लाभणार आहे. विशेष म्हणजे ४० वर्षांनी प्रशांत दामले आणि वर्षा उसगांवकर यांनी एकत्र अभिनय केलेले नाटक "सारखे काहीतरी होतेय" ही धम्माल कलाकृतीही पाहता येईल. या अधिवेशनाचा समारोप शंकर महादेवन यांच्या सांगीतिक कार्यक्रमाने "आपल्याला बघायला मिळेल.पुष्कर होईल. या दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत उत्तर अमेरिकेच्या २५ शहरातील स्थानिक कलाकारांची धमाल सादरीकरणेही होणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी