ब्रिटिश इंडियन ऋषी सुनक इंग्लंडच्या पीएम पदाच्या स्पर्धेत

Britain Former Finance Minister Rishi Sunak submitted a claim for the post of PM said the right decision has to be taken : इंग्लंडचे माजी अर्थमंत्री आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांचे जावई ऋषी सुनक हे प्राईम मिनिस्टर अर्थात पीएम पदाच्या स्पर्धेत आहेत.

Britain Former Finance Minister Rishi Sunak submitted a claim for the post of PM said the right decision has to be taken
ब्रिटिश इंडियन ऋषी सुनक इंग्लंडच्या पीएम पदाच्या स्पर्धेत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ब्रिटिश इंडियन ऋषी सुनक इंग्लंडच्या पीएम पदाच्या स्पर्धेत
  • इंग्लंडचे माजी अर्थमंत्री आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांचे जावई ऋषी सुनक
  • योग्यवेळी योग्य निर्णय घेईन : ऋषी सुनक

Britain Former Finance Minister Rishi Sunak submitted a claim for the post of PM said the right decision has to be taken : इंग्लंडचे माजी अर्थमंत्री आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांचे जावई ऋषी सुनक हे प्राईम मिनिस्टर अर्थात पीएम पदाच्या स्पर्धेत आहेत. बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडच्या पीएम पदाचा राजीनामा दिल्यापासून या पदावर कोण बसणार याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत पुढे आलेल्या नावांपैकी एक नाव ऋषी सुनक यांचे आहे. पण ऋषी सुनक यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेईन असे मोघम उत्तर देऊन माध्यमांसमोर त्यांच्या मनातील विचार उघड करणे टाळले आहे. 

ऋषी सुनक हे बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते. ब्रेक्झिट आणि कोरोना संकट या दोन कारणांमुळे मंदावलेल्या इंग्लंडच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी ऋषी सुनक यांनी अर्थमंत्री म्हणून अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच ते वयाने तरुण आहेत. यामुळेच ४२ वर्षांच्या ऋषी सुनक यांचे नाव इंग्लंडच्या पीएम पदाच्या स्पर्धेत आहे. 

बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर ऋषी सुनक यांनी जाहीरपणे एक डिजिटल कॅम्पेन (डिजिटल जाहिरात मोहीम) सुरू केले आहे. या कॅम्पेनद्वारे उघडपणे ऋषी सुनक यांनी पीएम पदासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. सुनक यांना इंग्लंडच्या संसदेतील काही सदस्यांनी त्यांचा पाठिंबा जाहीर केला आहे. राजकीय पाठिंब्यात पुढील काही दिवसांत वाढ होईल असा विश्वास ऋषी सुनक यांचे समर्थक करत आहेत. 

इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणे आणि चालना देणे, आंतरराष्ट्रीय पटलावर इंग्लंडचे महत्त्व वाढविणे ही कामं करण्यास समर्थ असल्याचा दावा ऋषी सुनक यांनी केला आहे. इंग्रज भारतीय (ब्रिटिश इंडियन) हा इंग्लंडच्या कहाणीचा शेवट नाही तर एक टप्पा आहे आणि इंग्लंडच्या उज्ज्वल भविष्यात योगदान देण्यासाठी समर्थ आहे अशा स्वरुपाचा प्रचार ऋषी सुनक यांनी सुरू केला आहे. रेडी फॉर ऋषी (Ready For Rishi) ही टॅगलाईन वापरून ऋषी सुनक यांनी डिजिटल कॅम्पेन सुरू केले आहे.

कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये एक परिषद होणार आहे. या परिषदेनंतर इंग्लंडच्या नव्या पीएमची निवड होईल, असे चित्र आहे. सध्या बोरिस जॉन्सन इंग्लंडचे हंगामी पीएम म्हणून कार्यरत आहेत. 

...म्हणून बोरिस जॉन्सन यांनी दिला राजीनामा

जून २०२२ मध्ये बोरिस जॉन्सन सरकारने बहुमत चाचणीचा अडथळा पार केला होता. जॉन्सन सरकारला २११ जणांचे समर्थन मिळाले होते तर १४८ जणांनी विरोध केला होता. बहुमताची चाचणी पार केल्यामुळे सरकार सुरक्षित आहे अशी चर्चा होती. पण जॉन्सन यांनी महत्त्वाची जबाबदारी दिलेल्या एका खासदारावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. गंभीर आरोप होऊनही संबंधित खासदाराचा बोरिस जॉन्सन यांनी  बचाव केला. यामुळेच परिस्थिती बिघडली. धडाधड मंत्र्यांनी राजीनामे सादर केले. तीन दिवसांत जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील ४० सदस्यांनी राजीनामे दिले. राजीनामा देणाऱ्यांमध्ये ऋषी सुनक यांचाही समावेश होता. वाढत्या दबावाला सहन करणे अशक्य झाल्यामुळे अखेर बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडच्या पीएम पदाचा राजीनामा दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी