Goa Rape : पणजी : गोव्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ब्रिटिश महिलेवर एका नराधमाने बलात्कार केला आहे. महिलेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेतला आणि त्याला कर्नाटकातून अटक केली आहे. आरोपीचे नाव जोएल विन्सेट डिसोझा आहे.
गोव्यात एक ब्रिटिश दाम्पत्य फिरण्यासाठी आले होते. तेव्हा उत्तर गोव्यात ही महिला मड बाथ घेण्यासाठी आली. हा मड बाथ देताना आरोपी जोएल विन्सेट डिसोझाने महिलेवर बलात्कार केला. ही घटना २ जून रोजी घडली. बलात्कार केल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. पीडित महिलेने झाली हकीगत आपल्या नवर्याला सांगितली. तेव्हा ६ जून रोजी या दाम्पत्याने पोलीस स्थानक गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ आरोपीच्या शोध घेण्यासाठी मोहीम राबवली आणि आरोपी डिसोझाला कर्नाटकातून अटक केली.
GOA: BRITISH NATIONAL RAPED IN NORTH GOA#Goa Police arrested a 32-year-old man for allegedly raping a #British woman at a beach in North Goa. pic.twitter.com/cfNdPCTWAO — Mirror Now (@MirrorNow) June 7, 2022
गोव्यात मड बाथ ही लोकप्रिय संकल्पना आहे. यामध्ये व्यक्तीच्या संपूर्ण शरीराला चिखल लावला जातो आणि आणि हा चिखल सुकण्यासाथी समुद्रकिनारी उन्हात थांबायचं असत. चिखल सुकल्यानंतर आंघोळ करायची असते. मड बाथमुळे त्वचा तजेलदार होते तसेच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत असेही सांगितले जाते.
परदेशी पर्यटकावर बलात्कार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. एक रशियन दाम्पत्य आपल्या १२ वर्षाच्या मुलीसोबत गोव्यात फिरण्यासाठी आले होते. हे कुटुंब एका हॉटेलमध्ये राहिले होते. मुलीचे पालक खरेदी करण्यासाठी बाहेर गेले आणि मुलीला हॉटेलवरच ठेवले. तेव्हा हॉटेलच्या एका कर्मचार्या या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. मुलीने आपल्या आई वडिलांना सर्व काही सांगितले तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली.