भावाने तीन मित्रांसोबत मिळून बहिणीवर केला बलात्कार 

भावानेच आपल्या बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

brother raped on sister with his 3 friends in rajasthan crime news marathi
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

  • पीडित मुलगी १७ मे रोजी दुपारी ४च्या सुमारास बेपत्ता झाली होती
  • पीडित मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी तिचे कपडे जंगलात मिळाल्याचे सांगत पोलीस स्टेशन गाठले 
  • पीडित मुलीचा मृतदेह २१ मे रोजी आढळला, पोलिसांनी कारवाई करत चौघांनी केली अटक  

जयपूर: बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना जयपूर येथे घडली आहे. बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देत हातावर राखी बांधणाऱ्या भावानेच बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका भावाने आपल्या तीन मित्रांसह बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील मनोहरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

नेमकी घटना काय? 

१७ मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास १० वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. यानंतर १८ मे रोजी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस स्टेशन गाठत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त सुरेश चौधरी यांनी सांगतले की, पीडित मुलगी ही गतीमंद असल्याने ती आपल्या घराचा पत्ता किंवा इतर माहिती देऊ शकत नाही. तीन दिवस शोध घेतल्यानंतरही हाती काहीच लागलं नाही.

टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना जयपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शंकर दत्त शर्मा यांनी सांगितले की, पीडित मुलीचा शोध घेण्यासाठी जवळपास १०० पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. यासोबतच कुटुंबातील सदस्य हे परस्पर विरोधी वक्तव्य करत होते. मुलगी बेपत्ता होण्यात त्यांची भूमिका संशयास्पद वाटू लगाली. कुटुंबानेच तिची हत्या करुन मृतदेह पुरला असा विचार करुनही आम्ही तपास सुरू केला. 

भावाने दिली गुन्ह्याची कबुली

तीन दिवसांनंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तिचे कपडे घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. हे कपडे जंगलात मिळाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी तपास केला असता पीडित मुलीचा मृतदेह जंगलात आढळला. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या भावाचे आणि इतरांचे कॉल रेकॉर्ड्स तपासण्यास सुरूवात केली. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत पीडित मुलीच्या भावाने आपला गुन्हा कबूल केला.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित मुलीची हत्या करण्यासाठी तिच्या भावाने आपल्या मित्रांसह तिला एखा अज्ञातस्थळी नेलं. मात्र, घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि मग गळा आवळून हत्या केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी