Drugs Recover: गुजरातच्या भुजमधून BSFने जप्त केले २५० कोटींचे ड्रग्स

BSF BHUJ RECOVERS DRUGS WORTH APPROXIMATELY 250 CRORE RUPEES : बीएसएफने गुजरातमधील भुजच्या जखाऊ बंदराच्या परिसरात जखाऊ सागरी पोलिसांच्या मदतीने संयुक्त शोध मोहीम राबवून सयाली क्रीकमधून ड्रग्सची ४९ पाकिटे जप्त केली.

BSF BHUJ RECOVERS DRUGS WORTH APPROXIMATELY 250 CRORE RUPEES
Drugs Recover: गुजरातच्या भुजमधून BSFने जप्त केले २५० कोटींचे ड्रग्स 
थोडं पण कामाचं
  • Drugs Recover: गुजरातच्या भुजमधून BSFने जप्त केले २५० कोटींचे ड्रग्स
  • ड्रग्सची ४९ पाकिटे जप्त
  • जप्त केलेले ड्रग हे हेरॉईन असल्याचे वृत्त

BSF BHUJ RECOVERS DRUGS WORTH APPROXIMATELY 250 CRORE RUPEES : बीएसएफने गुजरातमधील भुजच्या जखाऊ बंदराच्या परिसरात जखाऊ सागरी पोलिसांच्या मदतीने संयुक्त शोध मोहीम राबवून सयाली क्रीकमधून ड्रग्सची ४९ पाकिटे जप्त केली. जप्त केलेले ड्रग हे हेरॉईन असल्याचे वृत्त आहे. पाकिटांवर 'कॅफे गॉरमेट' असे छापले होते.

याआधी ३०-३१ मे च्या रात्री तटरक्षक दल आणि एटीएस गुजरात पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून सर क्रीक आणि जखाउ बंदर यांच्या दरम्यान आयएमबीएल जवळ एक पाकिस्तानची नाव जप्त केली होती. या नावेवरील पाकिस्तानच्या सात नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. पण कारवाई सुरू आहे याचा अंदाज येताच नावेतील पाकिस्तानच्या नागरिकांनी ड्रग्सची पाकिटे समुद्रात फेकून दिली होती. वाऱ्याचा तसेच समुद्रातील लाटांचा अंदाज घेऊन पाण्यात फेकलेली ड्रग्सची पाकिटे कुठे वाहात गेली असतील याबाबत तर्क करून शोध घेण्यात आला. अखेर ड्रग्सची पाकिटे सापडली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी