Europe Tour | युरोपात फिरायला जाण्यासाठी जवळ खूप पैसे असावे लागतात, असा अनेकांचा गैरसमज असतो. युरोपीय देशांत फिरण्यासाठी जगातील इतर भागांच्या तुलनेत अधिक खर्च होतो, असंही काहींना वाटतं. यात काही अंशी तथ्य आहे. मात्र युरोपातील असे काही देश आहेत, जिथं अगदी कमी खर्चात चांगली ट्रिप करता येऊ शकते. रुपयांच्या तुलनेत तिथलं स्थानिक चलन हे परवडणारं असल्यामुळे आठवडाभर अगदी सहज फिरून येता येईल. जाणून घेऊया अशाच काही देशांविषयी.
हंगेरी हा युरोपीय देश तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीसाठी ओळखला जातो. मोठमोठे महाल, हिरवीगार राष्ट्रीय उद्यानं आणि वन्यप्राणी ही या देशातली खास आकर्षणाची ठिकाणं. इथल्या डेन्युब नदीवर बांधण्यात आलेला सस्पेंडेड ब्रीज हे पर्यटकांच्या आकर्षणाचं ठिकाण आहे. अत्यंत आकर्षक कॅफेमध्ये नाश्ता आणि जेवण करण्याचा आनंद इथं लुटता येतो. जर योग्य नियोजन करून पैसे खर्च केले, तर स्वस्तात इथली ट्रिप होऊ शकते.
1 रुपया - 4.22 फोरिंट
अधिक वाचा - 'टाटा प्ले'साठी जीसॅट-२४ अंतराळात स्थिरावला
पूर्व युरोपातील हा देश म्हणजे जणू स्वर्गच. अत्यंत रोमँटिक रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा लाल विटांनी करण्यात आलेलं बांधकाम प्रत्येकाला आपल्या प्रेमात पाडतं. इथली हिरवीदाट जंगलं आणि स्टॅलिनकालीन बांधकामे प्रत्येकालाच भुरळ घालतात. कसीनो, डिस्को आणि नाईटक्लब यांचं तुम्हाला आकर्षण असेल, तर बेलारूस हा उत्तम पर्याय ठरू शकतो. इतर युरोपीय देशांच्या तुलनेत भारतीय रुपया इथं चांगलाच मजबूत आहे.
1 बेलारुसी रुबल - 23 रुपये
अधिक वाचा - नशीब बलवत्तर म्हणून...भरधाव ट्रेनखाली सापडुनही बचावला 85 वर्षीय वृद्ध, पाहा व्हिडिओ
जर तुम्हाला नॉर्दन लाईट्स पाहण्यात रस असेल, तर आइसलँड हा उत्तम पर्याय आहे. या युरोपीय देशांतही भारतीय रुपया चांगलाच बहरात आहे. इथं तुम्ही तुम्हाला हवं तितकं फिरू शकता. झरे, पहाड आणि बीच यासाठी आइसलँड हा देश प्रसिद्ध आहे. विशेषतः नैसर्गिक गरम पाण्याचे झरे हे इथलं खास आकर्षण. इथले व्हेल मासे पाहण्यासाठीदेखील अनेक पर्यटक इथं येत असतात.
1 रुपया - 1.87 आइसलँडिक क्रोना
ईशान्य युरोपातील हा देश आपल्या अद्भूत सौंदर्यासाठी ओळखला जातो. इथं बर्फाच्छादित डोंगर, घनदाट जंगलं, प्राचीन पर्वत, पार्क यासारखी आकर्षक ठिकाणं पाहू शकता. इतर युरोपीय देशांच्या तुलनेत सर्बियात राहणं फारच स्वस्त आहे. सगळ्यात सोयीची गोष्ट म्हणजे 2017 सालापासून सर्बियात भारतीयांना व्हिसा न घेताही जाता येऊ शकतं.
1 रुपया - 1.46 सर्बियायी दिनार