दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ जून २०१९:  राज्याचा अर्थसंकल्प जाहीर ते इन्कम टॅक्सचे नवे नियम जाहीर

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

top 5 news_latest news_times now marathi
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ जून २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात.  राज्य सरकारनं आज  आपला अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर केला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. दुसरी महत्त्वाची बातमी आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संदर्भातली. विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे–पाटील भाजपमध्ये आले आणि कॅबिनेट मंत्री झाले आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मंत्रिपदाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. त्यानंतरची महत्त्वाची बातमी मोदी सरकार यांनी केलेल्या कारवाई संदर्भातली आहे. मोदी सरकारने पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. आयकर विभागातील अधिकाऱ्यांवर मोदी सरकारनं कारवाईचा बडगा उचलला आहे. चौथी महत्त्वाची आहे मनोरंजन विश्वातील. 'राणादा'च्या ऑनस्क्रिन वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. आता इन्कम टॅक्स संदर्भात नवे जाहीर झाले आहेत. या सर्व महत्त्वाच्या बातम्यावर नजर टाकूया केवळ एका क्लिकवर. 

Maha Budget 2019: अर्थसंकल्प जाहीर, पाहा बजेटमधून काय-काय मिळणारः राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. राज्य सरकारने आज आपला अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर केला आहे. संपूर्ण अर्थसंकल्प काय आहे हे जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 

राधाकृष्ण विखे-पाटील अडचणीत, मंत्रिपदाविरोधात हायकोर्टात याचिका दाखलः विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे–पाटील भाजपमध्ये आले आणि कॅबिनेट मंत्री झाले. मात्र त्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मंत्रिपदाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

मोदी सरकारची मोठी कारवाई, आयकर विभागातील १५ अधिकाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्तीः मोदी सरकारने पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या १५ अधिकाऱ्यांवर कारवाई करत सरकारने त्यांना सक्तीची निवृत्ती दिली आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 

'राणादा'च्या ऑनस्क्रिन वडिलांना खऱ्या पोलिसांनी केली अटकः तुझ्यात जीव रंगला मालिकेतील एका अभिनेत्यावर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी. 

Tax New Rules इन्कम टॅक्स संदर्भात नवे नियम जाहीर, जाणून घ्या नवे नियमः प्राप्तिकर विभागाची नियमावली बनवणाऱ्या विभागाने २०१९च्या प्रत्यक्ष कर भरणा प्रक्रिये संदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे. प्राप्तिकर अधिनियम १९६१ अंतर्गत या नव्या नियमांची कार्यवाही होणार आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १८ जून २०१९:  राज्याचा अर्थसंकल्प जाहीर ते इन्कम टॅक्सचे नवे नियम जाहीर Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles