दिवसा बुलडोझर, तर रात्री ओवेसी... जहांगीरपुरी बनला नवा राजकारणाचा अड्डा

bulldozer jahangirpuri : दिल्लीचा जहांगीरपुरी परिसर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. 16 एप्रिलपासून ते राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. बुधवारीही दिवसभर तो चर्चेत राहिला. अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत येथे अनेक बेकायदा बांधकामे पाडण्यात आली. याला धार्मिक रंग चढला ही दुसरी बाब आहे. लवकरच यात ओवेसींचीही एन्ट्री झाली.

Bulldozers during the day, Owesi at night ... Jahangirpuri became a stronghold of new politics
दिवसा बुलडोझर, तर रात्री ओवेसी... जहांगीरपुरी बनला नवा राजकारणाचा अड्डा ।   |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • जहांगीरपुरीत उत्तर दिल्ली महानगरपालिकेने आज सकाळी १० वाजता अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली.
  • एकामागून एक मशिदीच्या बेकायदेशीरपणे बांधलेल्या भिंती, दुकाने आणि दरवाजेही पाडण्यात आले.
  • अडीच तास चाललेली बुलडोझरची कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर थांबवण्यात आली.

नवी दिल्ली : दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या तणावानंतर ते सतत चर्चेत आहे. बुधवारी एमसीडीच्या कारवाई करीत बुलडोझरने बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात आली. त्यानंतर रात्री एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रात्री जहांगीरपुरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी भाजपसह आम आदमी पार्टी (AAP) वरही निशाणा साधला. 

जहांगीरपुरी प्रसिद्धीच्या झोतात कसे आले?

शनिवार 16 एप्रिल. दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर हिंसाचार उसळला. यादरम्यान 8 पोलिस कर्मचाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले. एका एसआयच्या हातालाही गोळी लागली. या प्रकरणी मुख्य आरोपी अन्सारसह अनेकांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाला धार्मिक रंग मिळाला आहे. यामुळेच त्याला वेग आला आहे.

महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिम

हनुमान जयंतीच्या घटनेनंतर, जहांगीरपुरी येथील उत्तर दिल्ली महानगरपालिका (NDMC) च्या अतिक्रमणविरोधी मोहिम राबवली. हे यूपी, मध्यप्रदेश आणि गुजरातच्या बुलडोझर कारवाईच्या संयोगाने पाहिले गेले. या राज्यांमध्ये आरोपींची घरे पाडण्याचे काम राज्य सरकारांनी केले आहे. दिल्लीतील जहांगीरपुरी येथे सुरू असलेल्या एमसीडीच्या बुलडोझरला सर्वोच्च न्यायालयाने ब्रेक लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या भागात यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ओवेसींची एन्ट्री 

एमसीडीने दिल्लीच्या जहांगीरपुरी भागातील अतिक्रमण आणि अवैध धंदे हटविण्यासाठी बुलडोझर मोहीम सुरू केली. यावेळी काही लोकांनी विरोध केला, तर काही लोक रडताना दिसले. जहांगीरपुरी येथील मशिदीभोवतीचे अतिक्रमणही तोडण्यात आले आहे. मशिदीच्या शेजारी एक दुकान होते, ते रस्त्याने जात होते, तो भाग आज पाडण्यात आला. मशिदीसमोर दोन्ही बाजूंनी बांधलेली छोटी भिंतही पाडण्यात आली.  मोहिमेमुळे स्थानिक लोक नाराज झाले आहेत. दरम्यान, सायंकाळी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी रात्रीच्या वेळी परिसरातील लोकांपर्यंत पोहोचले. ओवेसींनी भाजपवरच नव्हे तर आपवरही हल्लाबोल केला. बुलडोझरच्या कारवाईवर त्यांनी टीका केली. मशिदीसमोरील दुकाने तोडल्याचे सांगून धार्मिक द्रुवीकरणाला खतपाणी घालण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी