saffron in Jammu Kashmir जम्मू काश्मीरमध्ये केशराचे बंपर उत्पादन

bumper harvest of saffron in Jammu Kashmir यंदा जम्मू काश्मीरमध्ये केशराचे बंपर उत्पादन झाले आहे. जम्मू काश्मीरमधील ३७०० हेक्टर जमिनीवर केशराचे उत्पादन होते.

bumper harvest of saffron in Jammu Kashmir
जम्मू काश्मीरमध्ये केशराचे बंपर उत्पादन 
थोडं पण कामाचं
  • जम्मू काश्मीरमध्ये केशराचे बंपर उत्पादन
  • जम्मू काश्मीरमधील ३७०० हेक्टर जमिनीवर केशराचे उत्पादन
  • भारत सरकारने जम्मू काश्मीरमधील केशराचे जीआय टॅगिंग सुरू केले

bumper harvest of saffron in Jammu Kashmir । श्रीनगर: यंदा जम्मू काश्मीरमध्ये केशराचे बंपर उत्पादन झाले आहे. जम्मू काश्मीरमधील ३७०० हेक्टर जमिनीवर केशराचे उत्पादन होते. प्रामुख्याने पुलवामातील पंपोर येथे केशराचे उत्पादन घेतले जाते. पण मागील काही वर्षांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये केशराची शेती कमी-जास्त प्रमाणात सुरू झाली आहे. 

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मागील सहा वर्षांच्या तुलनेत यंदा जम्मू काश्मीरमध्ये केशराचे बंपर उत्पादन झाले आहे. जम्मू काश्मीरचे केशर हे जगातील सर्वोत्तम केशर समजले जाते. औषधी गुण असल्यामुळे केशराचे मूल्य जास्त आहे. यंदा बंपर उत्पादन झाल्यामुळे सरकारी यंत्रणेची मदत मिळाली तर व्यावसायिकदृष्ट्या केशराचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी लाभाचे ठरेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

जम्मू काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी केशराची शेती आणि केशर खरेदी ही मोठी आकर्षणं आहेत. भारत सरकारने जम्मू काश्मीरमधील केशराचे जीआय (geographical indication or GI is a sign used on products that have a specific geographical origin) टॅगिंग सुरू केले आहे. ही प्रक्रिया केशराला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी मिळवून देईल, असा विश्वास जम्मू काश्मीरमधील केशर शेती करणाऱ्यांना आहे. 

केशराचा वापर औषध निर्मिती, मिठाई सजवणे, दुधात घालून गर्भवती महिलेला देणे या प्रकारे मोठ्या प्रमाणावर होतो. यंदा बंपर उत्पादन झाल्यामुळे सरकारी यंत्रणा केशरापासून काय काय करणे शक्य आहे याचा अंदाज घेऊन केशर विक्रीसाठी नव्या बाजारपेठेचा शोध घेत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी