Population Decrease : वेगानं कमी होतेय जगाची लोकसंख्या, 2100 साली चीनची लोकसंख्या असेल निम्मी, भारताची लोकसंख्या 29 कोटींनी घटणार

जगातील अनेक देशांच्या लोकसंख्येत घट व्हायला सुरुवात झाली असून हे शतक संपल्यानंतर काय परिस्थिती असेल, याबाबतचं एक संशोधन समोर आलं आहे. त्यानुसार चीनची लोकसंख्या आतापेक्षा अर्धी झाली असेल, भारताची लोकसंख्या 29 कोटींनी घटली असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामागील कारणं फारच महत्त्वाची आहेत. वाचा सविस्तर.

Population Decrease
जगाची लोकसंख्या होतेय कमी  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • नव्या शतकात चीनची लोकसंख्या असेल आतापेक्षा अर्धी
  • भारताच्या लोकसंख्येत 29 कोटींची होणार घट
  • जगाची लोकसंख्या होतेय कमी

Population Decrease | जगाची लोकसंख्या झपाट्याने घटत असून पुढच्या शतकात याचे परिणाम जगातील अनेक देशांवर झाल्याचं दिसणार आहे. एका ताज्या संशोधनानुसार 2100 साली चीनची लोकसंख्या ही सध्याच्या लोकसंख्येपेक्षा निम्मी असेल तर भारताची लोकसंख्याही 29 कोटींनी घटलेली असेल. लोकसंख्येच्या घटत्या प्रमाणावर सध्या तरी कुठलाच उपाय नसून काही बाबतीत ही आनंदाची बाब मानली जात आहे. 

नव्या संशोधनातील महत्त्वाचे मुद्दे

लँसेट मेडिकल जर्नलनं भविष्यातील लोकसंख्येबाबतचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार 2064 सालापर्यंत जगाची लोकसंख्या 970 कोटींवर पोहोचेल आणि हा लोकसंख्येचा सर्वोच्च आकडा असेल. त्यानंतर लोकसंख्या कमी व्हायला सुरुवात होईल आणि 2100 सालापर्यंत जगाची लोकसंख्या 879 कोटींपर्यंत कमी झालेली असेल. वेगाने वृद्ध चाललेल्या चीनच्या लोकसंख्येवर सर्वाधिक परिणाम झाल्याचं दिसणार आहे. सध्या चीनची जेवढी लोकसंख्या आहे, त्या तुलनेत 2100 साली असणारी लोकसंख्या ही अर्धी होणार आहे. सध्या चीनची लोकसंख्या 140 कोटी आहे, ती पुढच्या शतकात 66 कोटींनी कमी होऊन 74 कोटी झालेली असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकसंख्या घटण्याचा हा ट्रेंड कमी होऊ शकत नाही, असा दावा वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीने केला आहे. चीन, भारत, अमेरिका आणि पाकिस्तान हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे देश आहेत, ज्यांच्या लोकसंख्येत पुढील शतकात आमुलाग्र बदल झाल्याचं दिसणार आहे.

अधिक वाचा - हनिमूनच्या रात्री बायकोच्या पोटावर दिसल्या खुणा, RTI मधून काढलेली माहिती पाहून बसला धक्का

जगाची लोकसंख्या का घटणार?

चीनमधील वाढत्या महागाईमुळे लग्न करणं आणि मुलांचं संगोपन करणं दिवसेंदिवस महाग होत चाललं आहे. त्यामुळे अनेक जोडपी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेत आहेत. अनेक तरुण लग्नच न कऱण्याचा निर्णय घेत आहेत. इटलीत 2017 साली लोकसंख्या होती 6.1 कोटी. मात्र यापैकी बहुतांश लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची आहे. त्यामुळे या शतकाच्या शेवटी इटलीची लोकसंख्या असेल फक्त 2.8 कोटी. जपानमध्येही तशीच परिस्थिती असून वृद्धांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे क्रयशक्ती असणारी लोकसंख्या कमी होत आहे. दक्षिण कोरियात शिक्षणाचा दर्जा सुधारल्यामुळे स्त्री-पुरुष समानता वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक जोडपी मूल होऊ न देण्याचा किंवा एकच मूल होऊ देण्याचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे तिथल्या लोकसंख्येतही घट होत आहे. ब्राझीलमध्येही छोट्या कुटुंबांचं आकर्षण वाढत चालल्याचं चित्र आहे. 

अधिक वाचा - Mumbai Police POCSO : …तर आणि तरच ‘पॉक्सो’ कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार, पोलीस आयुक्तांच्या नव्या आदेशाला आक्षेप, विचारले जातायत ‘हे’ सवाल

अफ्रिकेत लोकसंख्या वाढणार, अमेरिकेत घटणार

रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार अमेरिका, आशिया आणि युरोपातील लोकसंख्या नव्या शतकाच्या आगमनापर्यंत घटणार असून अनेक देशांच्या लोकसंख्येत आमुलाग्र बदल होणार आहे. तर अफ्रिकेची लोकसंख्या मात्र वाढणार आहे. लोकसंख्या वाढीचा वेग धीमा असेल, मात्र सातत्याने वाढ होत राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी