मुंबई : पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभेची एक जागा आणि बंगालमधील बालीगंगे, छत्तीसगडमधील खैरागड, बिहारमधील बोचाहान आणि महाराष्ट्राच्या उत्तर कोल्हापूरमधील चार विधानसभा जागांसाठीच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. आसनसोल लोकसभा जागा आणि पश्चिम बंगालमधील बालीगंगे विधानसभा पोटनिवडणुकीत टीएमसीने विजय मिळवला आहे, तर बिहारमध्ये आरजेडीला यश मिळाले आहे.
अधिक वाचा : Shocking Case : तरुणीला पाहून पोलीस-डॉक्टरही चक्रावले..., मुलीच्या पायावर लिहिले होते, I Hate You
आसनसोल मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा हे त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या अग्निमित्रा पॉल यांच्यावर आघाडीवर आहेत. बिहारी बाबूंना आतापर्यंत 3,75,026 हजार मते मिळाली आहेत, तर भाजपच्या अग्निमित्रा पॉल यांना 2,18,601 मते मिळाली आहेत. त्याचवेळी, छत्तीसगडमधील खैरागड मतदारसंघातील मतमोजणीत काँग्रेसच्या उमेदवार यशोदा वर्मा 15 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत, तर भाजप त्यांच्या मागे आहे, त्यानंतर या जागेवर काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे.
अधिक वाचा : Shocking Case : तरुणीला पाहून पोलीस-डॉक्टरही चक्रावले..., मुलीच्या पायावर लिहिले होते, I Hate You
राजदने बोचहान जागा जिंकली
बिहारच्या बोचहान जागेबाबत बोलायचे झाले तर येथे आरजेडी विजयी होताना दिसत आहे. 19व्या फेरीनंतर आरजेडीचे उमेदवार अमर पासवान 27,129 मतांनी आघाडीवर आहेत. बोचहान जागेवर आरजेडीचा विजय निश्चित झाल्याचे दिसत आहे.
अधिक वाचा : Hanuman Jayanti : औरंगाबादमध्ये मनसेकडून भाजप नेत्यांना हनुमान चालीसा पुस्तकांची भेट
कोल्हापूर उत्तर काॅंग्रेसकडे
महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. येथे काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा मोठा विजय झाला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून ते २६ व्या फेरीपर्यंत जयश्री जाधव आघाडीवर राहिली. मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री यांनी भाजपचा चांगल्या फरकाने पराभव केला आहे. त्याचवेळी निकाल आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जयश्रीच्या घराबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला.