CA Final 2022 Results : सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर, शहांचा मुलगा आला पहिला

CA Exam Results 2022, 12449 Candidates clears CA Final Exam : भारतातील आयसीएआय या संस्थेने मे २०२२ मध्ये घेतलेल्या सीए फायनल परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार १५ जुलै २०२२) जाहीर झाला.

CA Final 2022 Results
सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर
  • शहांचा मुलगा आला पहिला
  • मीत अमित शहा आला पहिला

CA Exam Results 2022, 12449 Candidates clears CA Final Exam : भारतातील आयसीएआय या संस्थेने मे २०२२ मध्ये घेतलेल्या सीए फायनल परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार १५ जुलै २०२२) जाहीर झाला. हा निकाल https://icai.nic.in/caresult/ या वेबसाईटवर बघता येईल. आयसीएआय या संस्थेकडून मे २०२२ मध्ये घेतलेल्या सीए फायनल परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या टॉपर्सची मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.

आयसीएआय या संस्थेकडून मे २०२२ मध्ये घेतलेल्या सीए फायनल परीक्षेला बसलेले विद्यार्थी परीक्षेचा निकाल https://icai.nic.in/caresult/ या वेबसाईटवर बघू शकतील. निकाल बघताना विद्यार्थ्यांनी सोबत परीक्षेसाठीचे हॉल तिकीट (अॅडमिट कार्ड) सोबत बाळगावे. विद्यार्थ्यांना स्वतःच्या निकालाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हॉल तिकीट (अॅडमिट कार्ड) मधील माहिती नमूद करून एखाद्या बटणावर क्लिक करावे लागेल.

सीए फायनल परीक्षेच्या निकालाविषयी अधिकृत माहितीसाठी https://icai.nic.in/caresult/ या वेबसाईटला भेट द्या.

शहांचा मुलगा आला पहिला

आयसीएआय या संस्थेने मे २०२२ मध्ये घेतलेल्या सीए फायनल परीक्षेत मुंबईचा मीत अनिल शहा (Meet Anil Shah) (महाराष्ट्र) हा मुलगा भारतातून पहिला आला. जयपूरचा अक्षत गोयल (Akshat Goyal) (राजस्थान) भारतातून दुसरा आला. सुरतची श्रृष्टी केयुरभाई संघवी (Shrushti Keyurbhai Sanghavi) (गुजरात) भारतातून तिसरी आली.

CA Final toppers 2022

CA topper Marks obtained Rank City
Meet Anil Shah 642 1 Mumbai
Akshat Goyal 639 2 Jaipur
Shrushti 611 3 Surat

CA Final pass percentage May 2022

Group Number of candidates who appeared Number of candidates who passed CA final Pass percentage (%)
Group I 66,575 14,643 21.99
Group II 66,253 13,877 22.94
Both groups 29,348 3,695 12.59

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी