धक्कादायक... टॅक्सी चालकाने भररस्त्यात महिलेला थांबवून चेहऱ्यावर थुंकला, गळा दाबला 

Cab driver spits on woman face: एक विचित्र आि ध्कादायक घटना समोर आली आहे. एका दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेला टॅक्सी चालकाने रोखलं आणि तिच्या अंगावर थुंकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

cab driver spits on woman face tries to strangle bengaluru karnataka crime news marathi google
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • एका कॅब चालकाने महिलेसोबत केले घृणास्पद कृत्य 
  • कॅब चालकाने दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेला रोखलं 
  • यानंतर कॅब चालकाने महिलेवर थुंकत तिचा गळा आवळला

बंगळुरू: कर्नाटकातील बंगळुरूमधील बेलंदूर भागात एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. एका कॅब चालकाने दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेला जबरदस्तीने भररस्त्यात थांबवले आणि त्यानंतर तिच्यावर हल्ला केला. ही घटना बुधवारी दुपारी  चार वाजण्याच्या सुमारास बेलंदूर तलावाजवळ घडली आहे.

बंगळुरू मिररने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित सरिता (बदलले नाव आहे) ने सांगितले की, आरोपी टॅक्सी चालकाने तिच्या दुचाकीला मागून धडक दिली. पीडित महिला एका खासगी कंपनीत फोटोग्राफर म्हणून काम करते. तिने आरोपी कॅब चालकाच्या विरोधात बेलंदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पीडित महिलेने सांगितले की, "मी माझं काम संपवून घरी परतत होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बेलांदूर तलावाजवळ कॅब चालकाने माझ्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यानंतर कॅब चालक गाडीतून खाली उतरला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली."

आरोपी कॅब चालकाने महिलेला शिवीगाळ केली आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर थुंकला. ज्यावेळी पीडित महिलेने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिच्यावर हल्ला केला. इतकंच नाही तर कॅब चालकाने भररस्त्यात या महिलेचा गळा आवळला. 

पीडित महिलेने सांगितले की, "या कॅब चालकाच्या तावडीतून सुटण्यासाठी मी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यानंतर काही स्थानिक नागरिक माझ्या मदतीला धावून आले आणि त्यांनी मला वाचवले. घटनास्थळावर नागरिकांची गर्दी होताच आरोपीने तेथून पळ काढला."

या संपूर्ण घटनेमुळे मी इतकी घाबरली होती की त्या पुरुषापासून मी स्वत:ची सुटका करु शकली नाही. कसंबसं मी त्या आरोपीच्या गाडीचा नंबर लिहू शकले आणि त्यानंतर घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला असंही पीडित महिलेने सांगितलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी