Delhi Pollution: जेव्हा केंद्रीय मंत्री संसदेत रोज सायकलने येतात!

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 26, 2019 | 17:16 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Delhi Pollution: केंद्रीय खते आणि रसायन राज्यमंत्री मनसूख मांडविया सध्या आपल्या निवासस्थानातून संसदेत सायकलने येतात. त्यांच्या या इकोफ्रेंडली प्रवासाची सध्या दिल्लीत चर्चा आहे. या उपक्रमाचे स्वागतही होत आहे.

cabinet minister mansukh mandaviya
केंद्रीय मंत्री मनसूख मांडविया सायकलवरून येतात संसदेत  |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषणाची पातळी धोकादायक झाली आहे. यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न अधून-मधून सुरू असतो. पण, हा प्रयत्न म्हणजे, लोका सांगे ब्रह्म ज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशीच स्थिती असते. बदलाची सुरुवात स्वतःपासून करणारे काही मोजकेच असतात. पण, सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एक मंत्री मात्र याला अपवाद आहेत. त्यांनी बदलाची सुरुवात स्वतःपासून केली आहे. केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री मनसूख मांडविया सध्या आपल्या निवासस्थानातून संसदेत सायकलने येतात. त्यांच्या या इकोफ्रेंडली प्रवासाची सध्या दिल्लीत चर्चा आहे. अनेकांनी त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांचा वापर टाळणं हा एकमेव पर्याय आहे. त्या पार्श्वभूमीवर मांडविया यांनी स्वतःपासूनच हा बदल करायला सुरुवात केली आहे.

प्रेरणा देणारा उपक्रम

दिल्लीतील प्रदूषण हा आता राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय आहे. जगातील प्रमुख प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली आघाडीवर आहे. शहरात गाड्यांमधून निघणारा धूर अनेक रोगांचे कारण ठरत आहे. पण, केंद्रीय मंत्री मांडविया यांनी आपल्या इकोफ्रेंडली उपक्रमाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांचा सायकलवरून संसदेत येतानाचा एक व्हिडिओ करण्यात आला आहे. तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. गुजरातचे असलेले मांडविया रोज सायकलने संसदेत येतात. त्याची दखल घेऊन काहींनी त्यांचा व्हिडिओ शूट केला आणि पर्यावरणाचा संदेश देत तो सोशल मीडियावर शेअरही केला. त्या व्हिडिओला खूप लाईक्स मिळत असून, लोक मांडविया यांचे कौतुक करत आहेत. मांडविया यांच्या या उपक्रमाचा किंवा व्हिडिओचा किती फरक पडेल हे सांगता येत नाही. पण, त्यांनी केलेली सुरुवात निश्चित प्रेरणा देणारी आहे.

 

दिल्लीला गरज सायकलींची

पर्यावरणाची किंवा निसर्गाची चिंता करताना एखाद्या पर्यावरण संस्थेशी जोडले जाणे आवश्यक नाही. केवळ सायकल चालवून आपण पर्यावरण चळवळीमध्ये सहभागी होऊ शकतो. सायकल चालवणे हे आरोग्यासाठी हितकारक असून, सगळ्यांनीच हा पर्याय स्वीकारला तर, प्रदूषणाची पातळी खाली आणण्यात यश येणार आहे. त्यामुळं सायकलचा दुरेही फायदा असून, दिल्लीसारख्या शहरात सायकल चालवण्यासाठी सर्वसामान्यांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त होत आहे. दिल्लीत केजरीवाल सरकारने सम-विषम क्रमांकाच्या गाड्या रस्त्यावर आणण्याचा निर्णय करून एक प्रयोग केला होता. पण, त्याला विरोधही झाला आणि त्याचा परिणामही दिसला नाही. पण, मांडविया यांच्यासारख्या मंत्र्यांनी जर, आदर्श घालून दिला तर, दिल्लीच्या रस्त्यांवर आणखी सायकली धावताना दिसतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Delhi Pollution: जेव्हा केंद्रीय मंत्री संसदेत रोज सायकलने येतात! Description: Delhi Pollution: केंद्रीय खते आणि रसायन राज्यमंत्री मनसूख मांडविया सध्या आपल्या निवासस्थानातून संसदेत सायकलने येतात. त्यांच्या या इकोफ्रेंडली प्रवासाची सध्या दिल्लीत चर्चा आहे. या उपक्रमाचे स्वागतही होत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles