Gujarat मध्ये केबल पूल तुटला..., सुमारे 500 लोक नदीत बुडाले, मृत्युचा थरार कॅमेऱ्यात कैद

Bridge Collapsed: गुजरातमधील मोरबी भागात मच्छू नदीत केबल पूल कोसळला. अनेक जण मृत्यू झाल्याची भीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. अधिकाऱ्यांना शक्य ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेव्हा पूल तुटला तेव्हा बरेच लोक त्याच्या वर होते असे सांगितले जात आहे.

Cable bridge collapses in Gujarat..., nearly 500 people drown in river, death throes caught on camera
Gujarat मध्ये केबल पूल तुटला..., सुमारे 500 लोक नदीत बुडाले, मृत्युचा थरार कॅमेऱ्यात कैद   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मच्छू नदीवरील भीषण अपघात
  • पूल तुटल्याने 150 लोक बुडाल्याचा गृहमंत्र्यांचा दावा
  • शेकडो जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे

अहमदाबाद:  गुजरातमधील मोराबी येथे रविवारी मोठी दुर्घटना घडली. मोरबी जिल्ह्यातील मणी मंदिराजवळील मच्छु नदीवरील केबल पूल कोसळला आहे. केबल वायरचा पूल तुटल्याने अनेक जण नदीत पडले आहेत. आतापर्यंत 60 हून अधिक मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे.(PM Narendra Modi speak to Gujarat CM Bhupendra Patel).

अधिक वाचा : Washington Square Shocking Fact : या प्रसिद्ध उद्यानाखाली पुरलेले आहेत 20 हजारांहून अधिक मृतदेह...जगातील भुताटकीच्या जागांमध्ये समावेश

घटनेच्या वेळी पुलावर हजारो भाविक उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या पुलाची दुरवस्था झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाच दिवसांपूर्वी दुरूस्ती करून तो पुन्हा लोकांसाठी खुले करण्यात आले.

मोरबीच्या मच्छु नदीवर बांधलेला हा पूल बराच जुना आहे. मोरबीचा हा ऐतिहासिक पूल महाराजा वाघजी ठाकोर यांनी १८८७ मध्ये बांधला होता. या पुलाची एकूण लांबी ७६५ फूट असून रुंदी ४.५ फूट आहे. राजवाड्यातून राजदरबारात जाण्यासाठी महाराज या पुलाचा वापर करत असत असे म्हणतात. तीन दिवसांपूर्वी खुला झालेला हा पूल गेल्या सात महिन्यांपासून नूतनीकरणासाठी बंद होता. दिवाळीची सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी आले होते.

अधिक वाचा : थेट BJP खासदाराशी भिडला अधिकारी, चॅलेंज स्विकारली केली नदीच्या काठावरच आंघोळ

मोरबी येथील अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी बचाव कार्यासाठी तात्काळ पथके तयार करण्यास सांगितले, परिस्थितीचे बारकाईने आणि सतत निरीक्षण करावे आणि बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरबी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपयांची एक्स-ग्रेशिया जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, ऑर्बी केबल ब्रिज कोसळणे ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. मोरबी येथे सायंकाळी 6.30 च्या सुमारास पूल कोसळला. या अपघातात सुमारे 150 जण नदीत बुडाले. अग्निशमन दल, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, डॉक्टर, रुग्णवाहिका अवघ्या 15 मिनिटांत घटनास्थळी पोहोचली आणि मदतकार्य सुरू केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी