प्रसिद्ध केक कंपनीच्या डिलीव्हरी बॉयने ६६ महिलांवर केला बलात्कार

लोकल ते ग्लोबल
Updated Feb 23, 2021 | 13:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

ही घटना पश्चिम बंगालच्या हुबळी जिल्ह्यातील आहे. येथे एका प्रसिद्ध कंपनीची केक डिलीव्हरी बॉय महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार करत असे. 

cake
 प्रसिद्ध केक कंपनीच्या डिलीव्हरी बॉयचा ६६ महिलांवर बलात्कार 

थोडं पण कामाचं

  • हा आरोपी फीडबॅकच्या नावाने महिलांना व्हिडिओ कॉल करत असे
  • महिलांना ब्लॅकमेल करून शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती करत असे
  • पोलिसांनी आरोपीला अटक करून टाकले तुरूंगात

मुंबई: पश्चिम बंगालच्या हुबळी जिल्ह्यातील प्रसिद्ध कंपनीच्या एका केक डिलीव्हरी बॉयने असे काहीसे कृत्य केले आहे जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. इतकं की या डिलीव्हरी बॉयला लोग सीरियल बलात्कारी म्हणू लागले आहे. त्याने केलेला गुन्हा इतका मोठा आहे की महिलांनी या डिलीव्हरी बॉयला मोठी शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्याने ज्या पद्धतीने ही कृत्ये केली ते ऐकून लोकांनाच मोठा धक्का बसला. 

इतकंच नव्हे, आरोपीने महिलांसोबत ब्लॅकमेलिंग आणि बलात्कारसारख्या घटनांना ज्याप्रमाणे अंमलात आणल्या हे समजल्यानंतर खुद्द पोलीसही खूप हैराण झाले. खरंतर, या प्रसिद्ध कंपनीचा डिलीव्हरी बॉय कंपनीच्या उत्पादनांच्या फीडबॅक घेण्याच्या बहाण्याने महिलांना व्हिडिओ कॉल करत होता. आरोपीने सांगतले की फीडबॅक घेण्याच्या नावावर व्हिडिओ कॉल केल्यानंतर महिलांना काही आपत्तीजनक फोटो आणि व्हिडिओ बनवल्यानंतर तो त्या महिलांना ब्लॅकमेल करत असे. ब्लॅकमेल केल्यानंतर तो महिलांना शारिरीक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत असे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, हुबळीच्या कोटा येथील त्रिकोण पार्कमध्ये राहणाऱ्या विशाल वर्मावर ६६ महिलांना ब्लॅकमेल करत बलात्कार करण्याचा आरोप आहे. चंदननगर कमिश्नरेटच्या अंतर्गत चुचुडा पोलीस ठाण्याच्या विशाल वर्माआणि त्याच्या इतर साथीदाराला सुमन मंडलला अटक करून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. 

इतकंच नव्हे तर या प्रकरणात आरोपी विशाल वर्माच्या आईने खुद्द आपल्या मुलावरील आरोपांचा स्वीकार केला आहे. तसेच या कृत्यामध्ये सामील होण्याचा आरोपही मान्य केला आहे. चुचुडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक करत त्यांच्याविरोधात कारवाई करताना भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ५०६,५०९, ३८४, ३४, ३५४B अंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना तुरुंगात धाडले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी