कॅनडात पीएम विरोधात ट्रक चालकांचे आंदोलन

Canadian PM and his Family Moved To Secret Location Amid Protests : सुरक्षा रक्षकांनी राजधानी ओटावात सुरू असलेल्या आंदोलनाचे स्वरुप पाहून कॅनडाचे पीएम जस्टिन ट्रुडो आणि त्यांच्या घरातील सर्व सदस्यांना गुप्त अशा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले.

Canadian PM and his Family Moved To Secret Location Amid Protests
कॅनडात पीएम विरोधात ट्रक चालकांचे आंदोलन 
थोडं पण कामाचं
  • कॅनडात पीएम विरोधात ट्रक चालकांचे आंदोलन
  • राजधानी ओटावात तीव्र आंदोलन
  • कॅनडाचे पीएम जस्टिन ट्रुडो आणि त्यांच्या घरातील सर्व सदस्यांना गुप्त अशा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले

Canadian PM and his Family Moved To Secret Location Amid Protests : ओटावा (Ottawa) : कॅनडाचे पीएम (पंतप्रधान / Prime Minister / PM) जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या विरोधात हजारो ट्रक चालकांनी संघटीतपणे आंदोलन केले. या आंदोलनासाठी ५० हजारपेक्षा जास्त ट्रक चालक आले होते. आंदोलनाच्या ठिकाणी २० हजारपेक्षा जास्त ट्रक होते.  राजधानी ओटावा येथे ट्रक चालकांनी पीएम जस्टिन ट्रुडो यांच्या विरोधात घोषणा दिल्या. सुरक्षा रक्षकांनी आंदोलनाचे स्वरुप पाहून पीएम जस्टिन ट्रुडो आणि त्यांच्या घरातील सर्व सदस्यांना गुप्त अशा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले.

कॅनडा सरकारने लसीकरण सक्ती लागू केली आहे तसेच कोरोना प्रोटोकॉल पण सुरू ठेवला आहे. ट्रक चालकांनी तसेच देशातील इतर नागरिकांनी सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन केले. हजारो ट्रक रस्त्यावर आल्यामुळे ७० किलोमीटरपर्यंत पीएम विरोधात घोषणाबाजी करणारे आंदोलक दिसत होते. आंदोलकांनी स्वतःच्या पथकाला 'फ्रीडम कॉन्व्हॉय' असे नाव दिले होते. 

कोरोना संकट हाताळण्यात पीएम जस्टिन ट्रुडो अपयशी ठरले आहेत आणि हे अपयश लपविण्यासाठी त्यांनी लसीकरण सक्ती आणि कोरोना प्रोटोकॉल अशी कठोर बंधने नागरिकांवर लादली आहेत; असा आरोप आंदोलक करत होते. 

याआधी कॅनडाच्या पीएमनी देशातील ट्रक चालकांचा महत्त्व नसलेले अल्पसंख्यांक असा उल्लेख केला होता. या उल्लेखामुळे आणि कोरोनाशी संबंधित बंधनांमुळे संतापलेल्या ट्रक चालकांच्या नेतृत्वात 'फ्रीडम कॉन्व्हॉय' पीएम विरोधात घोषणाबाजी करत होते. आंदोलकांमध्ये ट्रक चालकांव्यतिरिक्त मोठ्या संख्येने महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग पण सहभागी झाले होते. अनेक आंदोलक कॅनडातील युद्ध स्मारकाच्या परिसरात दाखल झाले आणि घोषणा देत नृत्य करत होते. काही आंदोलक कॅनडाच्या संसदेच्या परिसरात पोहोचले. आंदोलनाचे स्वरुप पाहून राजधानीत हाय अलर्ट जाहीर करण्यात आला. पीएम जस्टिन ट्रुडो आणि त्यांच्या घरातील सर्व सदस्यांना गुप्त अशा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी