[VIDEO] 'उमेदवार चोर असो किंवा डाकू त्याला पाठिंबा द्या', भाजप खासदाराने उधळली मुक्ताफळं 

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी एक अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता भाजपवर देखील जोरदार टीका होऊ लागली आहे.

candidate whether thief or crook support him controversial statement of bjp mp see video 
[VIDEO] 'उमेदवार चोर असो किंवा डाकू त्याला पाठिंबा द्या', भाजप खासदाराने उधळली मुक्ताफळं   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • प्रचारादरम्यान भाजप खासदाराने उधळली मुक्ताफळं
  • 'उमेदवार चोर असो किंवा डाकू त्याला पाठिंबा द्या', भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
  • भाजप नेत्याच्या वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीका

रांची: 'भारतीय जनता पक्षाने (BJP) जो कोणी उमेदवार निवडला असेल मग तो चोर असो किंवा बदमाश असो. आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आपल्याला आपल्या केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे की, त्यांनी केलेली निवड ही योग्यच आहे.' असं वादग्रस्त वक्तव्य झारखंडचे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य कॅमेऱ्यात कैद झालं असून आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. 

झारखंडमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना निशिकांत दुबे असं म्हणाले की, 'ज्या कुणाला भारतीय जनता पक्ष उमेदवार बनवेल मग तो विकलांग असो, चोर असो, डाकू असो किंवा बदमाश असो. पण काहीही झालं तरी आपण त्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे. आपल्याला केंद्रीय नेतृत्व अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रघुवीर दास हे जी काही निवड करतील ती योग्यच असेल.' असं वादग्रस्त वक्तव्य निशिकांत दुबे यांनी केलं आहे. 

 

 

पुढे ते असं म्हणाले की, 'भाजप हा काही भ्रष्ट पक्ष नाही. आम्ही केंद्रात किंवा राज्यात कोणालाही पैसे घेऊ दिले नाहीत किंवा खाऊ दिले नाही. आज आम्ही पी. चिंदबरम सारख्या व्यक्तीला जेलमध्ये टाकलं आहे. त्यामुळे आता आपल्याला २ ते ३ दिवसात असंही ऐकू येईल की, आम्ही सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांना देखील जेलमध्ये टाकलं आहे.'

निशिकांत दुबे हे या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत आहेत. याच प्रचारादरम्यान, त्यांनी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

दरम्यान, आता निशिकांत दुबे यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली जात आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांनी दुबे यांचा जबरदस्त समाचार घेतला आहे. 

 

 

'ही एक घाणेरडी, विकृत आणि असंसदीय विचारप्रणाली आहे. स्वत: ला झारखंडचा दुसरा चाणक्य मानणार्‍या खासदार साहेबांची विचारसरणी ऐका आणि समजून घ्या. यामुळे झारखंडमध्ये भाजपला वाटणारी भीती आणि निराशा स्पष्टपणे दिसून येत आहे. आज जनतेचे मुख्य प्रश्न आहेतः बेरोजगारी, वाढती महागाई, स्थानिक प्रश्नांकडे होणार दुर्लक्ष, शेतकर्‍यांच्या समस्या, बंद पडत असलेल्या शाळा, बंद पडत असलेली महाविद्यालये, खालपासून वरपर्यंत सुरु असलेला भ्रष्टाचार, बेलगाम नोकरशाही, सरकारची हुकूमशाही वृत्ती, घसरलेली कायदा व सुव्यवस्था. तरीही खासदार साहेब चोर, डाकू आणि बदमाशांना तिकीट देऊन जनतेला अपील करत आहेत की, त्यांना विजयी करा.' 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...