सावधान Omicron चा संसर्ग ! ही लक्षणे असल्यास positive असण्याची दाट शक्यता

omicron symptoms : कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं आहे. दिवसागणिक याचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तुम्हाला सर्दी सारखी लक्षणेत आहे. जसे की श्वासोच्छोवास करताना फुरफूर आवाज, डोकेदुखी, आणि थकवा येणे ही लक्षण असल्यास कोविडच्या ओमिक्रॉन प्रकारासाठी तुम्ही पाॅझिटिव्सह असण्याची शक्यता आहे.

 Caution Omicron Infection! If you have these symptoms, chances are positive
सावधान Omicron चा संसर्ग ! ही लक्षणे असल्यास positive असण्याची दाट शक्यता ।  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ओमिक्राॅनची नवनीन गंभीर लक्षणं दिसत आहेत.
  • आता आरोग्य विभागाचं टेंशनही वाढलं आहे.
  • लसीकरण पूर्ण होऊनही ओमिक्राॅनची लागण होत असल्याचं चित्र आहे.

omicron symptoms मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचं संकट संपलेलं नसतानाच ओमिक्राॅन व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं आहे. दिवसागणिक याचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. देशातील अनेक राज्यांत हा व्हेरिएंट हातपाय पसरत आहे. महाराष्ट्रात रविवारी सहा रुग्ण सापडले असून राज्यात एकूण ५४ वर आकाडा पोहचला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचं टेंशनही वाढलं आहे. यातच आता ओमिक्राॅनची नवनीन गंभीर लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.  यूकेच्या अभ्यासानुसार, जर तुम्हाला सर्दी सारखी लक्षणेत आहे. जसे की श्वासोच्छोवास करताना फुरफूर आवाज, डोकेदुखी, आणि थकवा येणे ही लक्षण असल्यास कोविडच्या ओमिक्रॉन प्रकारासाठी तुम्ही पाॅझिटिव्सह असण्याची शक्यता आहे. (Caution Omicron Infection! If you have these symptoms, chances are positive)

महाराष्ट्रात सर्वाधिक केसेस

भारतात गेल्या 24 तासांत 6,563 नवीन कोविड-19 केसेस नोंदवल्या गेल्या आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज दिली. कोविड महामारीच्या सुरुवातीपासून देशातील एकूण रुग्णांची संख्या 3,47,46,838 वर पोहोचली. भारतातील सक्रिय केसलोड सध्या ८२,२६७ आहे. तर ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटनमुळे चिंता वाढली असून भारतातील एकूण ओमिक्रॉनची संख्या 150 ओलांडली आहे. त्यामध्ये सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे आता आरोग्य विभागाचं टेंशनही वाढलं आहे. एका अभ्यासानुसार आता ओमिक्राॅनची नवनीन गंभीर लक्षणं दिसत असून लसीकरण पूर्ण होऊनही ओमिक्राॅनची लागण होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. डेल्टा व्हेरिएंटमध्ये आढळून येत असलेली लक्षणं मात्र या ओमिक्राॅन व्हेरिएंटमध्ये दिसून येत नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

अभ्यासात ही लक्षणे आढळली

झो कोविड स्टडी अॅपने लाखो लोकांना त्यांची लक्षणे लॉग करण्यास सांगितले. हा डेटा डेल्टा व्हेरियंट आणि नवीन हायली ट्रान्समिसिबल व्हेरिएंट ओमिक्रॉन या दोघांशी जोडलेले आहेत. 3 ते 10 डिसेंबर दरम्यान नोंदवलेल्या विषाणूची सर्वात सामान्य चिन्हे म्हणजे नाक वाहणे, डोकेदुखी, थकवा, शिंका येणे आणि घसा खवखवणे.

अभ्यासात असे दिसून आले आहे की सुपर म्युटंट विषाणू हा कोविडच्या सर्दीसारखा आहे. याउलट, विशिष्ट कोविड लक्षणांमध्ये सतत खोकला, उच्च तापमान किंवा त्यांची चव आणि वासाची भावना बदलणे यांचा समावेश होतो. ओमिक्रॉनची लक्षणे प्रामुख्याने सर्दी, नाक वाहणे, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि शिंका येणे ही आहेत, त्यामुळे लोकांनी घरीच राहावे कारण ते कोविड पाॅझिटिव्ह असू शकते.

गर्दी टाळणे गरजेचे

"ख्रिसमसच्या आधी, जर लोकांना एकत्र यायचे असेल आणि असुरक्षित कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठेवायचे असेल, तर ख्रिसमसपर्यंत सामाजिक संपर्क मर्यादित ठेवण्याची आणि मोठ्या मेळाव्याच्या आधी काही पार्श्व प्रवाह चाचणी (Lateral Flow Tests ) करण्याची शिफारस करण्यात येत आहे." प्रोफेसर स्पेक्टर म्हणाले की या आठवड्यात ताप, खोकला किंवा वास कमी होणे यासारखी “क्लासिक” कोविड लक्षणे आता केवळ थोड्याच रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. . 

यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) कडील डेटा देखील दर्शवितो की कोविड पॉझिटिव्ह प्रकरणांतही सौम्य लक्षणे दिसून येत नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यामुळे मुख्य वैद्यकीय अधिकारी ख्रिस व्हिटी यांनी "गंभीर सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी