राज्यसभेचं सीट शंभर कोटीला विकणारे गजाआड, चौघा आरोपीपैकी एकजण महाराष्ट्रातला

राज्यसभा सीट (Rajya Sabha Seat)  आणि राज्यपालाच्या (Governor) पदासाठी कोट्यवधी रुपयांची डील करणारे चौघेजण गजाआड झाले आहेत. राज्यसभा सीट आणि राज्यपालाच्या पदासाठी काही भामट्यांनी थेट बोली सुरू केल्याचं निदर्शनात आल्यानंतर यंत्रणा जागी होत या भामट्यांना अटक केली आहे.

Four arrested for offering Rajya Sabha seats for 100 crores
100 कोटीला राज्यसभा सीट देणाऱ्या चौघांना अटक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चारही जण राज्यसभा सीट, राज्यपाल आणि अन्य पदांसाठी लोकांकडून पैसे घेत
  • सीबीआयने अटक केलेल्या आरोपींपैकी कमलाकर प्रेमकुमार बांदगर महाराष्ट्रातला आहे.

मुंबई: राज्यसभा सीट (Rajya Sabha Seat)  आणि राज्यपालाच्या (Governor) पदासाठी कोट्यवधी रुपयांची डील करणारे चौघेजण गजाआड झाले आहेत. राज्यसभा सीट आणि राज्यपालाच्या पदासाठी काही भामट्यांनी थेट बोली सुरू केल्याचं निदर्शनात आल्यानंतर यंत्रणा जागी होत या भामट्यांना अटक केली आहे. सीबीआयने (CBI) 100 कोटी रुपयांमध्ये राज्यसभा सीट तसंच राज्यपाल करण्याचं आश्वासन देणाऱ्या चौघांना अटक केली असून यातील एक आरोपी महाराष्ट्रातील आहे. तर एकाला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. 

सीबीआयच्या अटकेत असणाऱ्या तिघांची नावं कमलाकर प्रेमकुमार बांदगर, रवींद्र विठ्ठल नाईक, महेंद्र पाल अरोरा आहे. तसेच आणखी एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. हे चारही जण राज्यसभा सीट, राज्यपाल आणि अन्य पदांसाठी लोकांकडून पैसे घेत होते. मागच्या काही आठवड्यांपासून सीबीआयचे अधिकारी फोन इंटरसेप्टरमधून कॉल ऐकत होते. या आरोपींवर सीबीआयनं नजर ठेवली होती, त्याचे प्रत्येक कॉल ऐकली जात होती. डील जेव्हा फायनल होणार होती, त्याचवेळी सीबीआयने या आरोपींना अटक केली आहे. 

Read Also : रणवीर सिंगविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

सीबीआयने अटक केलेल्या आरोपींपैकी कमलाकर प्रेमकुमार बांदगर महाराष्ट्रातला आहे, तर रवींद्र विठ्ठल नाईक कर्नाटकचा, महेंद्र पाल अरोरा दिल्लीचा आहे. अभिषेक बुरा हा आरोपीही या डीलमध्ये सामील असल्याचा दावा सीबीआयने केला आहे.  दरम्यान मागील आठवड्यात महाराष्ट्रातही अशीच घटना घडली होती. भाजपच्या आमदाराकडून कॅबिनेट मंत्री पदासाठी 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. फक्त एकच नाही तर आणखी तीन आमदारांनाही अशाप्रकारे फसवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासाठी 17 जुलै रोजी आरोपींनी आमदारांना ओबेरॉय हॉटेलमध्ये भेटायला सुद्धा बोलावले होते.

Read Also : आजचे राशीभविष्य; जाणून घ्या आजचा मंगळवार तुमच्यासाठी कसा

मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी या आरोपींनी 100 कोटी मागितले होते. यातील 20 टक्के रक्कम आता द्यावी लागणार होती त्यानंतर उरलेली रक्कम ही शपथविधी सोहळा पार पडल्यावर द्यायची होती, असं या आरोपींनी सांगितलं होतं. या आरोपींनी सोमवारी आमदारांना मुंबईतील नरिमन पॉइंटवर भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर आमदारांनी पैसे घेण्यासाठी हॉटेल ओबेरॉयमध्ये नेले होते.
याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर, पोलिसांनी सापळा रचून अँटी एक्स्टॉर्शन सेलने आरोपीला पकडले.

Read Also : देसी तूप आणि काळी मिरी खाण्याचे आहेत अतुलनीय फायदे

या आरोपींची चौकशी केली असता आणखी 3 जणांची नावं समोर आली. त्यानंतर या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. रियाज अल्लाबक्ष शेख (राहणार कोल्हापूर ) योगेश मधुकर कुलकर्णी (राहणार पाचपाखाडी, ठाणे) सागर विकास संगवई (राहणार ठाणे ) आणि जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (राहणार नागपाडा, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी