Manish Sisodia यांच्या घरावर CBI कडून १४ तास छापेमारी

दारू घोटाळ्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होत आहे. सीबीआयची छापेमारी अनेक तास सुरू होती, त्यांच्याविरोधात जोरदार केस तयार करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. दुसरीकडे, सिसोदिया यांच्या जवळच्या मित्रांवरही दारू व्यावसायिकांकडून कमिशन घेतल्याचा आरोप आहे

CBI raided Manish Sisodia's residence for 14 hours,
Manish Sisodia च्या घरावर CBI कडून १४ तास छापेमारी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मनीष सिसोदियाच्या घरावर सीबीआयचे छापे
  • मोबाईल फोन आणि अनेक कागदपत्रे जप्त,
  • सध्या कोणालाही अटक नाही

नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर आणि अन्य ३० ठिकाणी छापे टाकण्यात आले. 14 तासांच्या छाप्यानंतर सीबीआयचे अधिकारी तेथून बाहेर आले. त्याच्या घराची आणि वाहनांची झडती घेण्यात आली. अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली. (CBI raided Manish Sisodia's residence for 14 hours,)

अधिक वाचा : Video call वर मला तुझ्यासोबत... , अश्लिल फोटो पाठवून BJP चा बडा नेता हनीट्रॅपच्या जाळ्यात

दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर सीबीआयने 14 तास छापे टाकले. त्यानंतर सीबीआय अधिकारी तेथून निघून गेले. त्याच्या घराची आणि वाहनांची झडती घेण्यात आली. त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेला माल सीबीआयकडे नेण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिसोदिया यांना सध्या अटक होणार नाही. त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला. या प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यासह १६ जणांना आरोपी करण्यात आले होते. 17 ऑगस्ट रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी