दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांच्या घरावर CBIची धाड

दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयची धाड पडली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यानंतर कारवाई सुरू झाली आहे.

CBI raids residence of Delhi Deputy CM Manish Sisodia
दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांच्या घरावर CBIची धाड  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांच्या घरावर CBIची धाड
  • शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशी
  • सिसोदिया यांनी त्यांच्यावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयची धाड पडली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यानंतर कारवाई सुरू झाली आहे. ( CBI raids residence of Delhi Deputy CM Manish Sisodia )

सिसोदियांवर सीबीआय धाड तेलंगणातील व्यवहारांसाठी

मनीष सिसोदिया यांच्यावर तसेच दिल्ली सरकारच्या निवडक सरकारी अधिकाऱ्यांवर सीबीआयची धाड पडली आहे. काही दिवसांपूर्वी सिसोदिया तेलंगणामध्ये एका हॉटेलमध्ये थांबले होते. या हॉटेलमध्ये सिसोदिया आणि काही लोकांच्या भेटीगाठी झाल्या. यानंतर मोठे आर्थिक व्यवहार झाले. याच प्रकरणात सीबीआय चौकशी करत आहे, असे भाजप खासदार परवेश वर्मा यांनी सांगितले.

अमेरिका किंवा युरोपमध्ये जायचे आहे...मग व्हिसासाठी थांबा 500 दिवस!

पंतप्रधानांनी घेतला एकच प्याला!

अबकारी कर घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई

अबकारी घोटाळा प्रकरणी भारतातील सात राज्यांमध्ये सीबीआयचे धाडसत्र सुरू आहे. दिल्ली एनसीआरमध्ये मनीष सिसोदियांच्या घरासह २१ ठिकाणी सीबीआयची धाड पडली आहे. सिसोदियांच्या घरावर धाड पडण्यामागे अबकारी कर घोटाळा तसेच तेलंगणात जाऊन सिसोदिया यांनी घेतलीली काही लोकांची भेट आणि या भेटींनंतर झालेले व्यवहार अशी इतर कारणेही असल्याचे सूत्रांकडून समजते.

सिसोदियांचे ट्वीट

सीबीआयची कारवाई सुरू होताच सिसोदिया यांनी एकामागून एक वेगाने ट्वीट केली. दिल्लीत शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात सुरू असलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्यांनी सीबीआय कारवाई सुरू केली आहे. या कारवाईचे स्वागत करतो; अशा स्वरुपाची ट्वीट सिसोदिया यांनी केली. न्यायालयात सत्य समोर येईल, असे सांगत सिसोदिया यांनी त्यांच्यावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले.

सकाळीच पडली धाड

आज (शुक्रवार १९ ऑगस्ट २०२२) सकाळीच सीबीआयने सिसोदियांच्या घरावर धाड टाकली. या व्यतिरिक्त दिल्लीच्या अबकारी कर विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर सीबीआयची धाड पडली आहे. दिल्लीत २१ ठिकाणी सीबीआयची कारवाई सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी