CBSE 10th, 12th Admit Card 2023: CBSE बोर्ड परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी हाती आहे. 2022-23 या वर्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 10वी आणि 12वीचे परीक्षा घेतली जाणार आहे. या बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र (admit card) जारी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे की माध्यमिक 10th आणि वरिष्ठ माध्यमिक 12th बोर्ड परीक्षांचे हॉल तिकीट सीबीएसईने अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट (Hall ticket) मिळवायचे असेल त्यांनी cbse.gov.in वर जाऊन स्कूल लॉग-इन करून हॉल तिकीट घ्यावे लागेल. ( CBSE 10th, 12th Admit Card 2023: CBSE Board Exam Admit Card Released, Get Hall Ticket)
अधिक वाचा : मुलं मुलीला भेटल्यानंतर सर्वात आधी बघतात या गोष्टी
ज्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाच्या माध्यमिक किंवा वरिष्ठ माध्यमिक वर्गाच्या परीक्षेसाठी फॉर्म भरला आहे, त्यांना त्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या संबंधित शाळेतून मिळू शकते. अधिकृत वेबसाइटवरुन डाउनलोड करून CBSEबोर्ड अॅडमिट कार्ड 2023 ची पडताळणी केल्यानंतर शाळा प्रमुख किंवा मुख्याध्यापक हे कार्ड विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतील. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रासाठी संबंधित शाळेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
सीबीएसई बोर्डाने वर्ष 2022-2023 साठी वर्ग 10 वी आणि 12 वीच्या वार्षिक परीक्षांचा कार्यक्रम आधीच जाहीर केला होता. बोर्डाने जारी केलेल्या CBSE 10वी, 12वीची वेळापत्रक 2023 नुसार, माध्यमिक वर्गाच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि 21 मार्चपर्यंत परीक्षा चालतील.
अधिक वाचा : लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?
तर, CBSE टाइम-टेबल 2023 नुसार, वरिष्ठ माध्यमिक वर्ग म्हणजे 12 वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि त्या 5 एप्रिलपर्यंत सुरू राहतील. अधिकृत वेबसाइटवरील सक्रिय लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून विद्यार्थी त्यांच्या संबंधित वर्गांसाठी CBSE डेटशीट 2023 PDF डाउनलोड करू शकतात.