CBSE Class 10 and 12 Term 1 Result 2021: नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) इयत्ता 10वी आणि 12वी टर्म 1 च्या निकालाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, CBSE 24 जानेवारी 2022 रोजी म्हणजेच आज निकाल जाहीर होतील. याआधी 15 जानेवारीला त्याची घोषणा झाल्याची बातमी समोर आली होती. परंतु माध्यमांनुसार आज निकाल जाहीर होणार आहेत.
आज निकाल जाहीर होणार असल्याचे वृत्त प्रासारित जरी झाले असले तरी बोर्डाकडून अद्याप कोणत्याच निकालाविषयीची वेळ-काळ घोषित करण्यात आलेला नाही. निकालाविषयी अधिकाऱ्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी यावर नकारही दिला नाही आणि होकार नाही. अशा स्थितीत बोर्डाकडून लवकरच निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. उमेदवार त्यांचा निकाल CBSE cbse.gov.in, cbse.nic.in आणि cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. याशिवाय, ते इतर डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे देखील निकाल तपासू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागेल.