CBSE 10th Result 2020: दहावीचा निकाल जाहीर, पाहा किती टक्के लागला निकाल

CBSE 10th Result 2020: cbseresults.nic.in वर आज म्हणजेच १५ जुलैला दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्यांना आपली गुणपत्रिका ऑनलाइन पाहता येणार आहे. 

cbse 10th result
प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: iStock Images) 

थोडं पण कामाचं

  • सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर
  • cbseresults.nic.in या वेबसाइटवर पाहता येणार निकाल 
  • IVRS, SMS या माध्यमातून देखील पाहता येणार निकाल

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई बोर्ड) ने १० वी परीक्षेचा निकाल आज (१५ जुलै २०२०) जाहीर करण्यात आल आहे. (CBSE 10 Result 2020 Declared) विद्यार्थी आपला निकाल cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. याबाबतची माहिती स्वत: केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. हा निकाल दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास जाहीर करण्याता आला आहे. हा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला असून cbse.nic.in, cbseresults.nic.in and results.nic.in. या वेबसाइटवर पाहता येणार आहे. दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच या सगळ्या वेबसाइट क्रॅश झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यास वेळ होत असल्याचं दिसून येत आहे. 

SMS आणि अॅपवरुनही पाहता येणार निकाल

  1. आपण सीबीएसई १०वीचा निकाल २०२० एसएमएसद्वारे प्राप्त करण्यासाठी, CBSE10 <ROLLNUMBER> <ADMITCARDID> टाइप करा आणि 7738299899 वर पाठवा. 
  2. आयव्हीआरएसच्या (IVRS) माध्यमातून विद्यार्थी त्यांचे निकाल पाहू शकतात. दिल्लीतील विद्यार्थी त्यांचा निकाल  लँडलाईनवरुन देखील तपासू शकतात. 24300699 यावर कॉल करुन निकाल जाणून घेता येणार आहे. तर दिल्लीबाहेरील विद्यार्थ्यांसाठी 011 - 24300699 हा क्रमांक आहे.
  3. मोबाइल अ‍ॅपद्वारे पाहता येणार निकाल-  सीबीएसई दहावीचे विद्यार्थी उमंग अॅपवर देखील त्यांचे निकाल आणि मार्कशीट पाहू शकतात.

सीबीएसई १०वीचा निकाल ९१.४६% 

सीबीएसई दहावी २०२० निकालात यंदा अल्पशी वाढ झाली आहे. यावर्षी एकूण ९१.४६% विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. २०१९ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९१.१९% होती. सीबीएसई १२वीच्या निकालात यंदा ५% पेक्षा जास्त सुधारणा दिसून आली होती.

यंदाही मुलींनीच मारली बाजी

सीबीएसई दहावीच्या परीक्षेत गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेली परंपरा यंदा देखील पाहायला मिळाली. ती म्हणजे या निकालात यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे. तब्बल ९३.३१% मुली यावेळी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९०.१४% मुलं उत्तीर्ण झाले आहेत

सीबीएसई निकालात त्रिवेंद्रमचा डंका 

यावर्षी सीबीएसई १०वी २०२०च्या परीक्षेसाठी एकूण १८,८५,८८५ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १८,७३,०१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ज्यापैकी १७,१३,१२१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. नेहमी प्रमाणेच यंदाही त्या  त्रिवेंद्रमने बाजी मारली आहे. यंदा त्रिवेंद्रमचा निकाल हा तब्बल ९९.२८% एवढा लागला आहे. त्यानंतर चेन्नई, बेंगलोर, पुणे, अजमेर यांचा क्रमांक लागतो. 

दरम्यान, सीबीएसईने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील दहावीच्या निकालाबाबत माहिती दिली आहे. यात असं म्हटलं आहे की, हा निकाल विद्यार्थी cbseresults.nic.in पाहू शकतात तसंच IVRS, SMS या माध्यमातून देखील ते निकाल पाहू शकतात.

CBSE 10th Result 2020:  असा पाहा आपला निकाल  

  1. दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला सीबीएसई वेबसाइट cbseresults.nic.in किंवा cbse.nic.in वर जावे लागेल. 
  2. यानंतर, आपल्याला मुख्यपृष्ठावरील दहावीच्या परीक्षेच्या निकालाची लिंक दिसेल, ज्यावर आपल्याला क्लिक करावे लागेल. 
  3. यानंतर आपला रोल नंबर, जन्मतारीख इत्यादी परीक्षेसंबंधी आपली सविस्तर माहिती भरुन सबमिट करावं.
  4. त्यानंतर आपण आपला निकाल स्क्रिनवर पाहू शकाल.

यंदा या संपूर्ण परीक्षेबाबत बराच घोळ पाहायला मिळाला. सुरुवातीला ईशान्य दिल्ली भडकलेल्या दंगलीमुळे सीबीएसईच्या १०वीच्या काही विषयांची परीक्षा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार होती, पण कोरोना संक्रमणामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. जी नंतर रद्दच करण्यात आली. त्यामुळे आता या परीक्षेत विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनात मिळालेल्या गुणांच्या आधारे गुण दिले जाणार आहेत. त्याशिवाय चार किंवा तीन विषयांत मिळवलेल्या सर्वोच्च गुणांची सरासरीसुद्धा या विषयांच्या मूल्यांकनाला आधार बनविण्यात आली आहे.

परीक्षा प्रणाली सुलभ आणि पारदर्शक होण्यासाठी सीबीएसईने दहावीच्या परीक्षेतील प्रत्येक विषयाचे अंतर्गत मूल्यांकन यासाठी २० गुण निश्चित केले आहेत. विद्यार्थ्यांना इंटरनल असेसमेंटमध्ये १० गुण हे पीरियाडिक टेस्ट (पीटी) साठी 10 गुण, ५ गुण गृहपाठ आणि ५ गुण हे  विषय नोंदणी कृतीसाठी निश्चित केले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी