CBSE 10th Result 2022: सीबीएसई बोर्डाच्या १०वीचा निकाल जाहीर, या लिंकवर पाहा मार्क्स

CBSE class 10th result announced: सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी आपला निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात. 

CBSE annouces clas 10th Result 2022 check details on cbseresult nic in
CBSE 10th Result 2022: सीबीएसई बोर्डाच्या १०वीचा निकाल जाहीर, या लिंकवर पाहा मार्क्स (प्रातिनिधिक फोटो) 
थोडं पण कामाचं
  • सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर 
  • विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात निकाल

CBSE 10th Result declared on cbseresults.nic.in : सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता १२वी प्रमाणेच दहावीचा निकालही बोर्डाने जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्डाने आपल्या cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईट्सवर दुपारी दोन वाजता निकालाची डायरेक्ट लिंक अॅक्टिव्हेट केली आहे. विद्यार्थी आपला निकाल या वेबसाईट्सवर पाहू शकतात. (CBSE announces clas 10th Result 2022 check details on cbseresult.nic.in)

यंदाच्या वर्षी एकूण २१०९२०८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती तर २०९३९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १९७६६६८ विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवलं आहे. यामुळे यंदाच्या वर्षी सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा निकाल हा ९४.४० टक्के इतका लागला आहे.

CBSE 10th Result Websites सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

cbse.gov.in

cbseresults.nic.in

यावेळी सीबीएसई बोर्डाने १२वीची परीक्षा २६ एप्रिल २०२२ ते १५ जून २०२२ या कालावधीत घेतली होती. ज्याचा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक हे निकालाची वाट पाहत होते अखेर निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे.

अधिक वाचा : Govt Jobs News : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, १० लाख पदांवर होणार भरती

CBSE 10th Result कसा आणि कुठे पहावा?

  1. सर्वप्रथम CBSE बोर्डाच्या www.cbse.gov.in या अधिकत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर मुख्य वेबसाईटची लिंक उघडा. 
  2. त्यानंतर Results या सेक्शनवर क्लिक करा.
  3. मग नवीन विंडो ओपन होईल. त्यातील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. 
  4. मग अशा प्रकारची विंडो ओपन होईल. 
  5. त्यात तुमचा रोल नंबर, शाळेची माहिती, जन्म दिनांक आणि अॅडमिट कार्ड नंबर पोस्ट करुन सबमिट करा 
  6. असे केल्यावर तात्काळ तुमचा निकाल तुम्हाल दिसून येईल. 
  7. हा निकाल तुम्ही डाऊनलोड करुन त्याची प्रिंटही काढू शकता.

अधिक वाचा : CBSE Result 2022 : सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, असा बघा निकाल

कुठल्या विभागाचा किती ट्क्के निकाल? 

यंदाही निकालात मुलींची बाजी

यंदाच्या वर्षी सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत सुद्धा मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थीनींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही ९५.२१ टक्के इतकी आहे. तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.८० टक्के इतकी आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे मुलांच्या तुलनेत १.४१ टक्क्यांनी अधिक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी