CBSE Class 10, 12 Board Exams 2022 : CBSE बोर्डाच्या वर्षांत 2 परीक्षा, अंतर्गत मूल्यांकन राहील महत्त्वाचे

कोरोना व्हायरस साथीच्या (Coronavirus Pandemic) पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षं शिक्षण क्षेत्रात गोंधळाचं वातावरण आहे.

CBSE Class 10, 12 Board Exams 2022
CBSE बोर्डाच्या वर्षांत 2 परीक्षा  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.
  • पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना दोन बोर्डाच्या परीक्षा द्याव्या लागतील
  • विद्यार्थ्यांना सेमिस्टर पद्धतीप्रमाणे Term I आणि Term II अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या वेळेला परीक्षा द्याव्या लागतील.

मुंबई : कोरोना व्हायरस साथीच्या (Coronavirus Pandemic) पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षं शिक्षण क्षेत्रात गोंधळाचं वातावरण आहे. शाळा, कॉलेज बंद, परीक्षा लांबणीला आणि अखेर रद्द यामुळे पुढचे प्रवेश अडकलेले अशा गोंधळाच्या परिस्थितीत पुढच्या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी (Board Exam) केंद्रीय शिक्षण बोर्डाने म्हणजे CBSE ने एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना दोन बोर्डाच्या परीक्षा (class X board exam) द्याव्या लागतील.

2021 मध्ये कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच 2022 च्या परीक्षांसाठी बोर्डाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. सीबीएसईनुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 2022 बोर्ड परीक्षांसाठी विशेष स्कीम तयार केली जाणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांना दोन सत्रात विभागण्यात येणार आहे. दोन्ही सत्रांच्या अखेरीस परीक्षा होतील. दोन्हीचा अभ्यासक्रमदेखील वेगवेगळा असेल. विद्यार्थ्यांना सेमिस्टर पद्धतीप्रमाणे Term I आणि Term II अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या वेळेला परीक्षा द्याव्या लागतील.  या दोन्ही परीक्षांचे गुण अंतिम गुणपत्रिकेत धरले जातील. पहिल्या टर्मची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये असणार आहे. तर दुसऱ्या टर्मची परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये असणार आहे. 

दोन्ही सत्र परीक्षा प्रत्येकी 90 मिनिटांच्या असतील. दोन्ही परीक्षांचे पेपर CBSE सेट करणार आहे. पहिली सत्र परीक्षा येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होईल तर दुसरी सत्र परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होणार आहे. 2022 च्या 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षांची योजना सीबीएसईने केली आहे. अंतर्गत मूल्यांकन (Internal Assessment) आणि प्रोजेक्ट वर्क (Project Work) . सीबीएसईचे शिक्षक जोसेफ इमैनुएल यांनी दिलेल्या आदेशानुसार, शिक्षण वर्ष 2021-22 करता पाठ्यक्रमात बदल करण्यात आले आहेत. दोन टर्ममध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. प्रत्येक टर्मच्या शेवटी बोर्ड परीक्षा घेतली जाणार आहे. 

अशी असणार टर्म 1 ची परीक्षा? 

फर्स्ट टर्मच्या शेवटी बोर्ड टर्म-१ परीक्षा घेईल. ही परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 या दरम्यान असेल. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. एमसीक्यू आणि रीजनिंग टाइप एमसीक्यू देखील विचारले जातील. प्रत्येक पेपर 90 मिनटांचा असेल. यात टर्म-1 च्या सिलॅबसमधूनच प्रश्व विचारले जातील. म्हणजेच संपूर्ण 50 टक्के सिलॅबसच्या 50 टक्के भागावरचे प्रश्न विचारले जातील. प्रश्न संच सीबीएसईच पाठवणार आहे. विद्यार्थी ज्या शाळांमध्ये शिकत असतील, त्याच शाळेत परीक्षा होईल. परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी सीबीएसई बोर्डाद्वारे एक्स्टर्नल सेंटर सुपरिटेंडंट्स आणि ऑब्जर्व्हर्स नियुक्त केले जातील. स्टुडंट्स ओएमआर शीट वर उत्तरे देतील. स्कॅन करून सीबीएसईच्या पोर्टल वर अपलोड केले जाईल. किंवा शाळा मूल्यांकन करून सीबीएसई पोर्टलवर अपलोड करतील. अंतिम निर्णय बोर्डाद्वारे शाळांना सूचित केला जाईल.

असा असणार टर्म-2 परीक्षेचा पॅटर्न?

टर्म-2 या इयर एंड परीक्षेचे आयोजनदेखील सीबीएसई द्वारेच केले जाईल. उर्वरित 50 टक्के सिलॅबसमधूनच प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा मार्च-एप्रिल 2022 दरम्यान घेतली जाईल. पेपर 2 तासांचा असेल. या विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातील. म्हणजेच एमसीक्यू, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रकारचे प्रश्न असतील.
कोरोनामुळे परिस्थिती सामान्य झाली नाही तर, टर्म-2 परीक्षा देखील 90 मिनिटांची असेल. टर्म-1 प्रमाणेच केवळ एमसीक्यू क्वेश्चन्स विचारले जातील. दोन्ही टर्म्सचे गुण विद्यार्थ्यांच्या एकूण बोर्ड निकालात समाविष्ट केले जातील. दरम्यान, पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्येही बाह्यकेंद्रावर परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती नसली तर दुसऱ्या सत्रात शाळा दोन तासाची परीक्षा घेतील, असं CBSE ने स्पष्ट केले आहे.

अंतर्गत मूल्यांकन ठरणार महत्त्वाचं

फक्त Term I आणि Term II च्या बोर्डाच्या परीक्षाच नव्हे तर वर्षभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाचं अंतर्गत मूल्यांकन अंतिम गुणपत्रिकेत महत्त्वाचं ठरणार आहे. या अंतर्गत मूल्यांकनालाच जास्त वेटेज देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यासाठी शाळा प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रोफाइल तयार करतील. विद्यार्थ्यांने वर्षभरात पूर्ण केलेला अभ्यास, प्रोजेक्ट, असाइनमेंट यावर विद्यार्थ्याचं अंतर्गत मूल्यमापन होईल आणि त्याची प्रतिमा अंतिम गुणपत्रिकेवर उमटेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेपुरता अभ्यास करून चालणार नाही, तर वर्षभर अभ्यास करावा लागणार आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी