CBSE Class 10 English Answer Key 2022 : सीबीएसई टर्म 2 क्लास 10 इंग्लिश पेपर आन्सर की

CBSE Class 10 English Answer Key Term 2 Exam 2022 : सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या इंग्रजीच्या पेपरची आन्सर की इच्छुक विद्यार्थी बघू शकतात.

CBSE Class 10 English Answer Key Term 2 Exam 2022
सीबीएसई टर्म 2 क्लास 10 इंग्लिश पेपर आन्सर की  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सीबीएसई टर्म 2 क्लास 10 इंग्लिश पेपर आन्सर की
  • विद्यार्थी त्यांचे आन्सर चेक करू शकतील आणि परीक्षेतील त्यांच्या कामगिरीबाबत अंदाज घेऊ शकतील
  • पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत घेतले जात आहेत

CBSE Class 10 English Answer Key Term 2 Exam 2022 : सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या इंग्रजीच्या पेपरची आन्सर की इच्छुक विद्यार्थी बघू शकतात. बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या आन्सर की आधारे विद्यार्थी त्यांचे आन्सर चेक करू शकतील आणि परीक्षेतील त्यांच्या कामगिरीबाबत अंदाज घेऊ शकतील. कोरोना संकटामुळे पहिल्यांदाच सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षेत दोन टर्ममध्ये परीक्षेचे आयोजन केले आहे. मुलांवरील मानसिक ताण कमी करण्यासाठी असे करण्यात आले. एका टर्ममध्ये फक्त ५० टक्के या पद्धतीने अभ्यासक्रम होता. 

सीबीएसई दहावीच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी दोन टर्ममध्ये परीक्षा घेत आहे. यातील दुसऱ्या टर्मचा इंग्रजीचा पेपर झाला. Central Board of Secondary Education, CBSE प्रत्येक पेपरचे सँपल पण जाहीर करत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्वरुपाचा अंदाज येण्यास मदत होत आहे. मागच्या टर्ममध्ये पेपर सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत घेतले जात होते. पण दुसऱ्या टर्ममध्ये वाढत्या उन्हाळ्याचा विचार करुन पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत घेतले जात आहेत. 

Watch CBSE Class 10 Term 2 English paper Answer Key here

स्पष्टीकरण: या विषयात शिकविण्याचा दीर्घ अनुभव असलेल्यांनी आन्सर की दिली आहे. टाइम्स नाउ मराठी answer key ची कोणतही जबाबदारी घेत नाही. ही उत्तरं फक्त संदर्भासाठी आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी