CBSE Exam revised date sheet: सीबीएसई १०वी, १२वीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल

CBSE Class 10th, 12th revised date sheet 2021: सीबीएसई बोर्डाने आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. जाणून घ्या कसं आहे हे नवं वेळापत्रक.

Exams
प्रातिनिधीक फोटो (फोटो सौजन्य: iStockimages) 

CBSE Class 10th, 12th revised date sheet 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई (CBSE)ने १०वी आणि १२वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. नवं वेळापत्रक हे सीबीएसई बोर्डाच्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पहायला मिळेल. सीबीएसईने शुक्रवारी (५ मार्च २०२१) रोजी दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे.

दहावीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक पाहण्यासाठी cbse.nic.in या लिंकवर क्लिक करा.

बारावीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक पाहण्यासाठी cbse.nic.in या लिंकवर क्लिक करा.

१२वीच्या परीक्षा वेळापत्रकात हे बदल

सीबीएसईने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार, १२वीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही परीक्षा १३ मे रोजी होणार होती मात्र, आता या विषयाची परीक्षा ८ जून २०२१ रोजी होणार आहे. यासोबतच इतिहास आणि बँकिंग परीक्षांच्या तारखेतही बदल करण्यात आला आहे.

१०वीच्या परीक्षा वेळापत्रकात हे बदल

तर इयत्ता १०वीच्या विज्ञान आणि गणित या विषयांच्या परीक्षांच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. १०वीच्या विज्ञान विषयाची परीक्षा आता २१ मे रोजी होणार आहे आणि गणित विषयाची परीक्षा २ जून रोजी होणार आहे. 

दोन शिफ्टमध्ये परीक्षा 

सीबीएसईने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार, १२वीची परीक्षा चार दिवसांसाठी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी १०.३० वाजता परीक्षा सुरू होईल आणि दुपारी १.३० वाजेपर्यंत सुरू राहील. तर दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २.३० वाजता परीक्षा सुरू होईल आणि सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहील. 

सीबीएसई १२वीची परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार असून १४ जून २०२१ पर्यंत सुरू राहणार आहेत. तर १५ जुलै २०२१ पर्यंत परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात होऊ शकतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी