CBSE CTET Admit Card 2021: हॉल तिकीट कधी, कुठे आणि कसे डाउनलोड करावे

ctet 2021 admit card : CBSE CTET 2021 ची परीक्षा 16 डिसेंबर ते 13 जानेवारी 2022 या कालावधीत दोन शिफ्टमध्ये होणार आहे.

cbse ctet admit card 2021 when where and how to download hall ticket check in marathi
CBSE CTET Admit Card 2021: हॉल तिकीट कधी, कुठे कसे मिळवाल 
थोडं पण कामाचं
  • CBSE CTET 2021 ची परीक्षा 16 डिसेंबर ते 13 जानेवारी 2022 या कालावधीत दोन शिफ्टमध्ये होणार आहे.
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (CTET) प्रवेशपत्र जारी करेल.
  • CBSE CTET प्रवेशपत्रे अधिकृत वेबसाइट - ctet.nic.in वर उपलब्ध असतील.

CBSE CTET Admit Card 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (CTET) प्रवेशपत्र जारी करेल. CBSE CTET प्रवेशपत्रे अधिकृत वेबसाइट - ctet.nic.in वर उपलब्ध असतील.

CBSE CTET 2021 ची परीक्षा 16 डिसेंबर ते 13 जानेवारी 2022 या कालावधीत दोन शिफ्टमध्ये होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते दुपारी 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 2.30 ते 5 या वेळेत घेतली जाईल. CBSE 20 भाषांमध्ये CTET आयोजित करण्यात येणार आहे. 

ही परीक्षा मल्टिपल चॉईस प्रश्न (MCQs) स्वरूपात असेल, त्यात कोणतेही नेगिटीव्ह मार्किंग नाही आणि प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल आणि प्रश्नपत्रिका द्विभाषिक, हिंदी आणि इंग्रजीमध्ये असेल.

CBSE CTET 2021 प्रवेशपत्र 2021 डाउनलोड करण्यासाठी पायऱ्या (Steps to download CBSE CTET 2021 Admit Card 2021):

  1. स्टेप 1: ctet.nic.in वर भेट द्या - अधिकृत वेबसाइट
  2. स्टेप 2: CTET डिसेंबर अॅडमिट कार्ड 2021' वर क्लिक करा (एकदा रिलेज झाले तर).
  3. स्टेप 3: स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल.
  4. स्टेप 4: विचारलेली क्रेडेन्शियल्स एंटर करा.
  5. स्टेप 5: तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  6. स्टेप 6: ते डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी