CBSE Exam Guidelines 2023 : सीबीएसई 2023 परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर, ChatGPT वर परीक्षा केंद्रात बंदी

CBSE Exam Guidelines 2023 : ChatGPT among prohibited items in CBSE exams : सीबीएसई बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. परीक्षेसाठी सीबीएसई बोर्डाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

CBSE Exam Guidelines 2023
सीबीएसई 2023 परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सीबीएसई 2023 परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
  • परीक्षा केंद्रावर चॅटजीपीटी (ChatGPT) आणि सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणण्यास आणि वापरण्यास बंदी
  • काय आहे चॅटजीपीटी (ChatGPT)?

CBSE Exam Guidelines 2023 : ChatGPT among prohibited items in CBSE exams : सीबीएसई बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. परीक्षेसाठी सीबीएसई बोर्डाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. 

सीबीएसई दहावीसाठी 21 लाख 86 हजार 940 विद्यार्थ्यांनी आणि सीबीएसई बारावीसाठी 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा भारतातील 7 हजार 250 आणि परदेशातील 26  परीक्षा केंद्रांवर होणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती cbse.gov.in वर उपलब्ध आहे. दहावीची परीक्षा 21 मार्च 2023 पर्यंत तर बारावीची परीक्षा 5 एप्रिल 2023 पर्यंत आहे. सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत पेपर होतील.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना

  1. अॅडमिट कार्ड सोबत घेऊन परीक्षा केंद्रात प्रवेश करा. जेव्हा मागितले जाईल त्यावेळी परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांना अॅडमिट कार्ड दाखवा.
  2. परीक्षेत कॉपी करणे, कॉपी करण्याचा प्रयत्न करणे, कॉपी करण्यासाठी मदत करणे हा गुन्हा आहे. हा गुन्हा करणे टाळा. प्रामाणिकपणे परीक्षा द्या.
  3. परीक्षा केंद्रावर चॅटजीपीटी (ChatGPT) आणि सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणण्यास आणि वापरण्यास बंदी

काय आहे चॅटजीपीटी (ChatGPT)?

चॅटजीपीटी म्हणजे चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर (Chat Generative Pre-trained Transformer - ChatGPT). हे ओपन सोर्स आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (Open Artificial Intelligence - OpenAI) वापर करून विकसित केलेले चॅटबॉट आहे. या चॅटबॉटला माहिती पुरवू शकता. नंतर हीच माहिती प्रश्न विचारून उत्तराच्या स्वरुपात हवी तेव्हा मिळवू शकता. चॅटबॉट भाषण, गाणे, बातमीचा मजकूर, निबंधाचा मजकूर अशा स्वरुपाची वेगवेगळी माहिती प्रश्नाचे उत्तर म्हणून उपलब्ध करण्यास सक्षम आहे. 

SSC, HSC Exam 2023 updates: 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षेसाठी 10 मिनिटे अधिक वेळ मिळणार

पोरांनो ऐकलं का ! मास्तर शाळेत पाच दिवस नसणार; पण का असेल गुरुजींची सुट्टी?, वाचा कारण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी