CBSE Board Exam 2023: CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेला सुरुवात

लोकल ते ग्लोबल
Updated Feb 15, 2023 | 18:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Central Board of Secondary Education (CBSE) सीबीएसईच्या 10वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत.

CBSE exam has started from today
CBSE Board Exam 2023: CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेला सुरुवात  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • कधी संपणार CBSE बोर्ड परीक्षा
  • सकाळी 10 नंतर कोणत्याही विद्यार्थीला परीक्षेच्या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी नाही
  • 10वीचा निकाल एप्रिल ते मे 2023 या कालावधीत जाहीर केला जाऊ शकतो

Central Board of Secondary Education (CBSE) सीबीएसईच्या 10वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा बुधवार 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या वर्गातील विद्यार्थी चित्रकला, गुरुंग, राय, तमांग आणि शेर्पा पेपर देतील, तर CBSE 12वीचे विद्यार्थी एंटरप्रेन्योरशिप या पेपरची सुरुवात करतील.

एका रिपोर्टनुसार, यावर्षी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 38 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यापैकी 21,86,940 इयत्ता 10 वीचे विद्यार्थी आहेत तर 16,96,770  विद्यार्थी 12वीचे आहेत. देशभरात या परीक्षा आयोजित करण्याबरोबरच सीबीएसई त्या परदेशातही घेते. यावेळी मंडळातर्फे 7250 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

कधी संपणार CBSE बोर्ड परीक्षा

बोर्डाची परीक्षा चालू होताच ती कधी संपणार याची सगळे वाट बघत असतात. इयत्ता 10वीचा शेवटचा पेपर 21 मार्च रोजी संपणार आहेत तर 12वीच्या परीक्षा 5 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत. सीबीएसईच्या दहावीच्या अंतिम परीक्षा 76 आणि 12 वीच्या अंतिम परीक्षा 115 विषयांसाठी घेतल्या जात आहेत.

परीक्षा हॉलमध्ये जाताना ही चूक करू नका

CBSE इयत्ता 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या दोन्ही परीक्षा सकाळी 10:30 वाजता सुरू होतील. सकाळी 10 पूर्वी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. सकाळी 10 नंतर कोणत्याही विद्यार्थीला परीक्षेच्या ठिकाणी प्रवेशास मनाई आहे. 

CBSE चा निकाल कधी लागणार?

तज्ज्ञांच्या मते, सीबीएसई 10वीचा निकाल एप्रिल ते मे 2023 या कालावधीत जाहीर केला जाऊ शकतो, तर सीबीएसई 12वीचा निकाल जून ते जुलै 2023 या कालावधीत जाहीर होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी