CBSE Exam: परीक्षेतील कॉपी बहाद्दारांना आळा घालण्यासाठी CBSE नं तयार केला मास्टर प्लॅन

CBSE Exam: परिक्षेत(Exam) कॉपी (copy) करणाऱ्या कॉपी बहाद्दरांना सीबीएसई जबरदस्त चपराक बसवणार आहे. जिथे कॉपी किंवा अनुचित पद्धतींचा वापर होण्याची दाट शक्यता आहे.

CBSE Exam Master plan prepared by CBSE for Copy Masters
कॉपी बहाद्दारांना आळा घालण्यासाठी CBSE चा नवा प्लॅन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • परीक्षेदरम्यान अनुचित माध्यमांचा वापर होण्याची उच्च शक्यता असलेल्या प्रकरणे आणि केंद्रे ओळखली जाणार.
  • बाह्य निरीक्षकांची नियुक्ती, भरारी पथके आणि सीसीटीव्हीच्या मदतीने परीक्षा केंद्राची देखरेख

CBSE Exam: मुंबई : परिक्षेत(Exam) कॉपी (copy) करणाऱ्या कॉपी बहाद्दरांना सीबीएसई जबरदस्त चपराक बसवणार आहे. जिथे कॉपी किंवा अनुचित पद्धतींचा वापर होण्याची दाट शक्यता आहे. त्या केंद्राची ओळख पटवून तेथे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) परीक्षांमध्ये निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी Advanced Data Analytics वापर करणार आहे. 

यासंदर्भात सीबीएसईचे संचालक (IT) अंत्रिक जोहरी म्हणाले की, परीक्षा प्रमाणित आणि न्याय्य पद्धतीने घेण्यात याव्यात. परीक्षेदरम्यान अनुचित मार्गांचा वापर होऊ, नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी बाह्य निरीक्षकांची नियुक्ती, भरारी पथके आणि सीसीटीव्हीच्या मदतीने देखरेख करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

परीक्षेदरम्यान अनुचित माध्यमांचा वापर होण्याची उच्च शक्यता असलेल्या प्रकरणे आणि केंद्रे ओळखण्यासाठी आम्ही आधुनिक डेटा विश्लेषणाचा वापर करून यामध्ये आणखी सुधारणा करण्याचे ठरवले आहे." केंद्र आणि वैयक्तिक परीक्षार्थी स्तरावरील संशयास्पद डेटा ट्रेंड ओळखण्यासाठी अल्गोरिदम विकसित करण्यासाठी केंद्रिय स्क्वेअर फाउंडेशन आणि प्लेपॉवर लॅब यांच्या सहकार्याने जानेवारी 2021 केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणीच्या डेटाचे प्रायोगिक तत्त्वावर विश्लेषण केले गेले आहे." असे CBSE चे संचालक म्हणाले.

"विश्लेषणाचे निकाल आणि विकसित केलेल्या अल्गोरिदमच्या आधारे, CBSE ने निर्णय घेतला आहे, की असे विश्लेषण इतर परीक्षांपर्यंत वाढवले ​​जाईल." ते म्हणाले की, दीर्घकाळात सीबीएसईने देशभरात घेतलेल्या सर्व परीक्षांमधील कोणत्याही प्रकारची अनियमितता रोखली जाईल. जोहरी म्हणाले की, सीबीएसईचे उद्दिष्ट आहे की अशा परीक्षा केंद्रांची ओळख पटविण्यासाठी असे विश्लेषण करणे, जेथे डेटा दर्शविते, परीक्षेदरम्यान गैरप्रकार होतात, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी