CBSE Fake Notice : सीबीएसई टर्म टू परीक्षेबाबतची फेक नोटीस होत आहे 'सर्क्युलेट', बोर्डाने दिला 'अलर्ट'

cbse fake notice circulating regarding term 2 exams board warns students via twitter cbse fake news : सोशल मीडियावर सीबीएसई टर्म टू परीक्षेबाबत एक फेक नोटीस व्हायरल झाली आहे.

cbse fake notice circulating regarding term 2 exams board warns students via twitter cbse fake news
सीबीएसई टर्म टू परीक्षेबाबतची फेक नोटीस होत आहे 'सर्क्युलेट'  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • सीबीएसई टर्म टू परीक्षेबाबतची फेक नोटीस होत आहे 'सर्क्युलेट'
  • बोर्डाने दिला 'अलर्ट'
  • व्हायरल होत असलेली आणि सीबीएसई बोर्डाने फेक असा शिक्का मारून ट्वीट केलेली नोटीस ही बनावट आहे

cbse fake notice circulating regarding term 2 exams board warns students via twitter cbse fake news : सोशल मीडियावर सीबीएसई टर्म टू परीक्षेबाबत एक फेक नोटीस व्हायरल झाली आहे. सीबीएसई बोर्डाने या नोटीसचा फोटो अधिकृत ट्विटर हँडलवर फेक असा शिक्का मारुन ट्वीट केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या नोटीसमध्ये सीबीएसई टर्म टू परीक्षेसाठी वर्गात उशिरात उशिरा किती वाजेपर्यंत येण्यास परवानगी आहे, पेपर झाल्यावर आन्सरशीट कशा प्रकारे सबमिट करावी, परीक्षेचे स्वरुप अशा वेगवेगळ्या मुद्यांवर माहिती आहे. प्रत्यक्षात व्हायरल नोटीसमधील माहितीपेक्षा वेगळी स्थिती परीक्षेच्या ठिकाणी आहे. 

कोरोना संकटामुळे पहिल्यांदाच सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षेत दोन टर्ममध्ये परीक्षेचे आयोजन केले आहे. मुलांवरील मानसिक ताण कमी करण्यासाठी असे करण्यात आले. एका टर्ममध्ये फक्त ५० टक्के अभ्यासक्रम अशी व्यवस्था आहे.

सीबीएसई दहावीच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी दोन टर्ममध्ये परीक्षा सुरू आहेत. मागच्या टर्ममध्ये पेपर सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत घेतले जात होते. पण दुसऱ्या टर्ममध्ये वाढत्या उन्हाळ्याचा विचार करुन पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत घेतले जात आहेत. 

परीक्षा सुरू आहे. परीक्षेबाबतची नियमावली बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर आहे. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली आणि सीबीएसई बोर्डाने फेक असा शिक्का मारून ट्वीट केलेली नोटीस ही बनावट आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी