CBSE Result 2022 : सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, असा बघा निकाल

सीबीएसई बारावीचा निकाल आज (शुक्रवार २२ जुलै २०२२) सकाळी दहा वाजता जाहीर झाला. हा निकाल ऑनलाईन बघता येईल.

CBSE Result 2022
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, असा बघा निकाल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर
  • सकाळी दहा वाजता जाहीर झाला निकाल
  • असा बघा निकाल

CBSE Result 2022 : सीबीएसई बारावीचा निकाल आज (शुक्रवार २२ जुलै २०२२) सकाळी दहा वाजता जाहीर झाला. हा निकाल ऑनलाईन बघता येईल. निकाल results.digilocker.gov.in/cbsehscerterm22022.html या वेबलिंकवर जाऊन बघता येईल. निकाल बघण्यासाठी ज्याचा निकाल बघायचा आहे त्या परीक्षार्थीचा रोल नंबर आणि स्कूल नंबर नमूद करून सर्च करावे लागेल. 

कंपार्टमेंट परीक्षा

कंपार्टमेंट परीक्षा २३ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार आहेत. विद्यार्थी कंपार्टमेंट परीक्षा देऊन एका विषयातील त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करू शकतील. यामुळे वर्ष वाया जाणार नाही आणि कामगिरीत सुधारणा करता येईल. कंपार्टमेंट परीक्षा बारावीच्या सत्र दोनच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पण कंपार्टमेंट परीक्षा देऊन त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी प्रयत्न करता येईल.

सीबीएसई बारावीची परीक्षा 

सीबीएसई बारावीची परीक्षा २६ एप्रिल २०२२ ते १५ जून २०२२ या कालावधीत जाईल. निकाल आज (शुक्रवार २२ जुलै २०२२) जाहीर झाला. यंदाच्या परीक्षेत १५ हजार ७९ शाळा आणि ६ हजार ७१४ परीक्षा केंद्रांचा सहभाग होता. सीबीएसई बारावीच्या परीक्षेसाठी १४ लाख ४४ हजार ३४१ जणांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १४ लाख ३५ हजार ३६६ जण परीक्षेला बसले. यातील १३ लाख ३० हजार ६६२ जण पास झाले. यंदाच्या वर्षाचे पास होण्याचे प्रमाण ९२.७१ टक्के आहे. 

सीबीएसई बारावीचा निकाल महत्त्वाचे :

  1. मुलींनी मारली बाजी. मुलांच्या तुलनेत ३.२९ टक्के जास्त मुली झाल्या पास.
  2. सीबीएसई बारावीच्या लेखी परीक्षेसाठी टर्म वनला ३० टक्के आणि टर्म टूला ७० टक्के महत्त्व देण्याचा सीबीएसई बोर्डाचा निर्णय.
  3. सीबीएसई बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दोन्ही टर्ममधील प्रात्यक्षिकांना समसमान महत्त्व देण्याचा सीबीएसई बोर्डाचा निर्णय.
  4. बोर्डाच्या निर्णयामुळे सीबीएसई बारावीच्या दुसऱ्या टर्मच्या लेखी परीक्षेत चांगली कामगिरी करणाऱ्यांना झाला मोठा फायदा.
  5. यंदा (२०२२) सीबीएसई बारावीच्या परीक्षेत ३३ हजार जणांना ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण
  6. यंदा (२०२२) सीबीएसई बारावीच्या परीक्षेत १.३४ लाख जणांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी