CBSE दहावी, बारावी टर्म १ च्या परीक्षांच्या निकालासंदर्भात ही महत्वाची बातमी

cbse class 10th and 12th term 1 result । सीबीएसई दहावी बारावी टर्म १ ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थीची नजर आता निकालावर आहे. सीबीएसईतर्फे यासंदर्भात कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आली नाही. तरी १५ जानेवारीपर्यंत हा रिझल्ट लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

cbse result term 1 examinations of classes 10th 12th can be declared by this date know details in marathi
CBSE दहावी, बारावी टर्म १ च्या परीक्षांच्या निकालाची अपडेट 
थोडं पण कामाचं
  • दहावी, बारावीच्या रिझल्टसंदर्भातील अपडेट
  • १५ जानेवारीपर्यंत रिझल्ट लागण्याची शक्यता
  • अधिकृत वेबसाइटवर मिळेल महत्वाची अपडेट

CBSE Result 2021, नवी दिल्ली: सीबीएसई दहावी, बारावी टर्म १ रिझल्ट २०२१ च्या घोषणेची वाट पाहत असलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (CBSE)देशभरातील संलग्न शाळांमधील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ दरम्यान दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. दोन टप्प्यातील बोर्ड परीक्षांचा पहिला टप्पा म्हणजेच टर्म १ च्या परीक्षांचे रिझल्ट लवकरच जाहीर केले जाणार आहेत. (cbse result term 1 examinations of classes 10th 12th can be declared by this date know details in marathi )

परीक्षा झाल्यानंतर लवकरच रिझल्ट जाहीर केला जाईल, असे सीबीएसई बोर्डाकडून परीक्षेपूर्वी सांगण्यात आले होते. सीबीएसईने टर्म १ च्या रिझल्टची तारीख जाहीर केली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डातर्फे १५ जानेवारी २०२२ पर्यंत इयत्ता दहावी आणि बारावी टर्म १ च्या परीक्षांचे रिझल्ट जाहीर करू शकतात

सीबीएसईने टर्म १ बोर्ड परीक्षांच्या मध्यावर मूल्यांकन धोरणातील बदल जाहीर करण्यात आला होता. १६ डिसेंबर २०२१ रोजी परीक्षेच्या तारखेलाच मूल्यांकन केले जाणार नाही, असे बोर्डाकडून शाळांना सांगण्यात आले. 

सीबीएसईच्या या निर्णयामुळे, किमान ७ विषयांचे (मेजर आणि मायनर) मूल्यमापन लांबले आणि त्यांचे मूल्यांकन शाळांनी बाह्य तपासणीसाठी बोर्डाकडे पाठवले. मूल्यमापन प्रक्रियेला जास्तीत जास्त ५ ते ७ दिवस लागतील, असे मानले जात होते. त्यामुळे सीबीएसई टर्म १ रिझल्ट २०२१-२२ जाहीर होण्यास विलंब अपेक्षित होता.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी