CBSE Term 1 Result : सीबीएसई पहिल्या टर्मच्या निकालांविषयी शाळांना २० एप्रिलपर्यंत नोंदवता येणार आक्षेप

Cbse Term 1 Result Now Schools Will Be Able To File Objections Till April 20 Also A Chance For Re Evaluation : सीबीएसई पहिल्या टर्मच्या (शैक्षणिक वर्ष २०२१-२२) निकालांविषयी शाळांना २० एप्रिलपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत

CBSE Term 1 Result
सीबीएसई पहिल्या टर्मच्या निकालांविषयी शाळांना २० एप्रिलपर्यंत नोंदवता येणार आक्षेप  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सीबीएसई पहिल्या टर्मच्या निकालांविषयी शाळांना २० एप्रिलपर्यंत नोंदवता येणार आक्षेप
  • https://www.cbse.gov.in/ या वेबसाइटवर नोंदवता येणार आक्षेप
  • विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल

Cbse Term 1 Result Now Schools Will Be Able To File Objections Till April 20 Also A Chance For Re Evaluation : नवी दिल्ली : सीबीएसई पहिल्या टर्मच्या (शैक्षणिक वर्ष २०२१-२२) निकालांविषयी शाळांना २० एप्रिलपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती दिली. शाळांना https://www.cbse.gov.in/ या वेबसाइटवर विद्यार्थ्यांच्या निकालांबाबत पुनर्मूल्यांकन विनंती, हरकती, आक्षेप नोंदविण्यासाठी २० एप्रिल २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 

विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल. विद्यार्थ्याला त्याचे म्हणणे लेखी स्वरुपात शाळेच्या प्रभारींसमोर मांडावे लागेल. ऑनलाइन विवाद निवारण यंत्रणेद्वारे विद्यार्थ्याची विनंती पुढे पाठवण्याची जबाबदारी संबंधित शाळेची असेल. शाळा स्कूल रिक्वेस्ट सबमिशन फॉर रिझोल्युशन म्हणजेच एसआरएसआर पोर्टलच्या माध्यमातून आक्षेप सीबीएसई बोर्डाकडे पाठवू शकेल. 

ज्या आक्षेपांचे निराकरण शाळेच्या पातळीवर शक्य आहे ते प्रश्न शाळाच सोडवेल आणि इतर सर्व आक्षेप संकलित करून शाळा त्यांचा एक रिपोर्ट एसआरएसआर पोर्टलच्या माध्यमातून आक्षेप सीबीएसई बोर्डाकडे पाठवू शकेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी