CDS Bipin Rawat सीडीएस बिपीन रावत पंचत्वात विलीन, १७ तोफांची सलामी आणि मुलीने दिला मुखाग्नी

तमिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात मृत पावलेल्या सीडीएस बिपीन रावत त्यांची पत्नी आणि इतर ११ जणांवर आज अंत्यसंस्कार पार पाडले. रावत यांचे पार्थिव त्यांच्या आवासाबाहेर ठेवण्यात आले होते. CDS Bipin Rawat and his wife Madhulika Rawat cremated

bipin rawat
बिपीन रावत  
थोडं पण कामाचं
  • बिपीन रावत त्यांची पत्नी आणि इतर ११ जणांवर आज अंत्यसंस्कार पार पाडले
  • दोन्ही मुलींनी आपल्या आई वडिलांना मुखाग्नी दिली
  • रावत यांच्या अंत्यसंस्कारावेळी सैन्याचे ८०० कर्मचारी उपस्थित होते.

CDS Bipin Rawat and his wife Madhulika Rawat cremated : नवी दिल्ली : तमिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात (tamil nadu helicopter crash) मृत पावलेल्या सीडीएस बिपीन रावत (bipin rawat), त्यांची पत्नी आणि इतर ११ जणांवर आज अंत्यसंस्कार पार पाडले. रावत यांचे पार्थिव त्यांच्या आवासाबाहेर ठेवण्यात आले होते.

आज सायंकाळी पाच वाजता सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर स्क्वेअर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांच्या दोन्ही मुलींनी आपल्या आई वडिलांना मुखाग्नी दिली. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. 

रावत यांच्या अंत्यसंस्कारावेळी सैन्याचे ८०० कर्मचारी उपस्थित होते. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, कायदे मंत्री किरेन रिजिजू, भारतातील फ्रान्सचे राजदूत इम्यॅन्युएल लेनिन आणि भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त ऍलेस एसिसही यावेळी उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही रावत यांच्या अंत्यसंस्कारावेळी हजेरी लावली आणि रावत आणि त्यांच्या पत्नीला श्रद्धांजली वाहिली.  

अंत्यसंस्कारापूर्वी यात्रेत सामील झालेल्या लोकांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जनरल रावत अमर रहे अशा घोषणा दिल्या. अंत्यसंस्कारावेळी स्मशानाबाहेरही उपस्थित नागरिकांनी देशभक्तीचे नारे दिले. जनरल रावत यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरातून सुरू झाली. वाटेत अनेक नागरिकांनी फुले वाहून रावत आणि त्यांच्या पत्नीला साश्रू निरोप दिला. उपस्थित नागरिकांनी त्यांच्या अंत्ययात्रेवर फुलांचा वर्षाव केला.

तमिळनाडूत हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत, त्यंच्या पत्नी मधुलिका रावत आणि ११ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता.

जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी त्यांचे पार्थिव अधिकारिक आवासात दर्शनासाठी ठेवले होते. नंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी १७ तोफांची सलामीही देण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी