CDS Bipin Rawat Chopper Crash फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला फोन, हेलिकॉप्टर दुर्घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड

CDS Bipin Rawat Chopper Crash: The phone sent for forensic investigation, the recording of the accident is recorded सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेचा व्हिडीओ एका फोटोग्राफरच्या मोबाइल फोनमध्ये रेकॉर्ड झाला आहे. हा फोन ताब्यात घेऊन पोलिसांनी कोइम्बतूर येथे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. 

CDS Bipin Rawat Chopper Crash
फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला फोन, हेलिकॉप्टर दुर्घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड 
थोडं पण कामाचं
  • फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला फोन, हेलिकॉप्टर दुर्घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड
  • हेलिकॉप्टर दुर्घटनेचा व्हिडीओ एका फोटोग्राफरच्या मोबाइल फोनमध्ये रेकॉर्ड
  • फोन ताब्यात घेऊन पोलिसांनी कोइम्बतूर येथे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला

CDS Bipin Rawat Chopper Crash: The phone sent for forensic investigation, the recording of the accident is recorded
चेन्नईः
सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेचा व्हिडीओ एका फोटोग्राफरच्या मोबाइल फोनमध्ये रेकॉर्ड झाला आहे. हा फोन ताब्यात घेऊन पोलिसांनी कोइम्बतूर येथे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. 

ज्याच्याकडून मोबाइल फोन जप्त केला तो फोटोग्राफर ओळखीतल्यांसोबत नीलगिरी जिल्ह्यातील कट्टेरी परिसरातल्या जंगलात फोटो घेण्यासाठी गेला होता. जंगलात असतानाच हेलिकॉप्टर कोसळत असल्याचे पाहून फोटोग्राफरने उत्सुकतेपोटी त्याच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओची तसेच तो ज्या मोबाइल फोनमध्ये आहे त्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. तर निवडक व्यक्तींना नेमके त्याचवेळी जंगलात जावेसे का वाटले आणि ते सांगत असलेल्या कारणात किती तथ्य आहे याचा तपास पोलीस करत आहेत. 

सीडीएस बिपीन रावत आणि त्यांची पत्नी एमआय-१७ व्हीएच हेलिकॉप्टरमधून जात होते. या हेलिकॉप्टरमध्ये रावत आणि त्यांची पत्नी यांच्या व्यतिरिक्त आणखी १२ जण होते. दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सीडीएस रावत आणि त्यांची पत्नी यांचाही समावेश आहे. दुर्घटनेत फक्त पायलट वाचला. पण जखमी झाल्यामुळे पायलटची प्रकृती गंभीर आहे, त्याच्यावर बंगळुरूच्या हॉस्पिट्लमध्ये उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी