CDS Bipin Rawat : सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचं सत्य आलं समोर, कोर्ट ऑफ इंक्वॉयरीने दिला रिपोर्ट

CDS General Bipin Rawat देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Helicopter Crash) दुर्दैवी मृत्यू झाला होता. बिपिन रावत यांच्यासह लष्करातील (Army) 14 अधिकाऱ्यांना देशाने गमावले. उच्च तंत्र सज्ज असलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला कसा असा प्रश्न अनेकांना पडला होता.

CDS Bipin Rawat
सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचं सत्य आलं समोर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हेलिकॉप्टर अपघाताच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इंक्वॉयरी गठित करण्यात आली होती.
  • बिपिन रावत यांच्यासह लष्करातील 14 अधिकाऱ्यांचा या अपघातात मृत्यू झाला होता.
  • हेलिकॉप्टर दुर्घटनेची एअर मार्शल मानवेंद्र सिंह कमिटीने आपली चौकशी पूर्ण केली आहे. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी चौकशी अहवाल कायदा विभागाकडे पाठवला आहे.

CDS General Bipin Rawat's Helicopter Crash Report : नवी दिल्ली :  देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Helicopter Crash) दुर्दैवी मृत्यू झाला होता. बिपिन रावत यांच्यासह लष्करातील (Army) 14 अधिकाऱ्यांना देशाने गमावले. उच्च तंत्र सज्ज असलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला कसा असा प्रश्न अनेकांना पडला होता. यामागे काय घातपात आहे का? अशा संशयाची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली. दोन इंजिन असलेलं IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजलं जातं. पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. 

दरम्यान हेलिकॉप्टर अपघाताच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इंक्वॉयरी गठित करण्यात आली होती. त्यांच्या तपासात आता मोठा खुलासा झाला आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह लष्करातील 14 अधिकारी असलेले हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागचे मोठे कारण समोर आले आहे. हेलिकॉप्टर खराब हवामानामुळेच क्रॅश झाल्याचं समितीच्या चौकशीतून समोर आले आहे.  लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन  हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.  मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले.   

प्राथमिक माहितीनुसार, बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही सोबत होते. वेलिंगटनमध्ये आर्मीचं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचे लेक्चर नियोजित होतं. वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, एअर मार्शल मानवेंद्र सिंह कमिटीने आपली चौकोशी पूर्ण केली असून कायदेशीर सल्ला घेण्यासाठी कायदा विभागाकडे पाठवले आहे. लवकरच यासंदर्भातील अहवाल वायुसेना  प्रमुखांकडे पाठविण्यात येणार आहे. 

अहवालाबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही 

दरम्यान, वायुसेनेच्या वतीने अहवालाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही. परंतु, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर क्रॅशच्या कारणांचा तपास करत असलेल्या कमिटीनं अहवालात म्हटलंय की, खराब हवामानामुळे वैमानिक 'विचलित' झाले असावेत, ज्यामुळे हा अपघात झाला. तांत्रिक भाषेत त्याला CFIT म्हणजेच 'Controlled Flight Into Terrain' म्हणतात. हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्रालयाने अपघाताचं कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी