Helicopter Crash : अपघातानंतर जिवंत होते बिपीन रावत, अखेरचे हिंदीत हे बोलले बचाव पथकाला 

Bipin Rawat Last Word : तामिळनाडूतील कुन्नूरजवळ बुधवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 जणांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला.

cds rawat was alive even after the helicopter crash rescue worker told what general rawat said in hindi for the last time
अपघातानंतर जिवंत होते बिपीन रावत, अखेरचे हिंदीत हे बोलले  
थोडं पण कामाचं
  • तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल रावत, त्यांच्या पत्नीसह 11 जणांचा मृत्यू झाला
  • अपघातानंतर बचाव कर्मचाऱ्याने जनरल रावत यांनी खालच्या आवाजात काय सांगितले
  • जंगलात अपघात झाल्याने बचाव कार्यात अडचण

Bipin Rawat Last Word in hindi ।  नवी दिल्ली : संपूर्ण देशासाठी बुधवारचा दिवस खूप वाईट बातमी घेऊन आला आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर कोसळले, त्यात 14 पैकी 13 जण ठार झाले. या अपघातात सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला. जनरल रावत यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले, तेव्हा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

बचाव कार्यकर्त्यानी सांगितले प्रत्यक्ष घटना 

व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला चादर गुंडाळून बचावकर्ते घेऊन जात असून जखमी व्यक्ती जनरल रावत असल्याचा दावा केला जात आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग असे या दुर्घटनेतील एकमेव बचावलेल्याचे नाव असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. शौर्य चक्र पुरस्कार विजेते ग्रुप कॅप्टन वरुणसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. NBT नुसार, अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेले वरिष्ठ अग्निशमन कर्मचारी आणि बचाव कर्मचारी एनसी मुरली यांनी सांगितले की, आम्ही दोन लोकांना जिवंत वाचवले. त्यापैकी एक सीडीएस रावत होते.

 हिंदीत हळू आवाजात बोलले 

मुरलीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी जनरल रावत यांना बाहेर काढले तेव्हा ते जिवंत होते आणि त्यांनी बचाव कर्मचार्‍यांशी धिम्या आवाजात हिंदीत बोलून त्यांचे नाव उघड केले. रुग्णालयात नेत असतानाच जनरल रावत यांचा मृत्यू झाला. मुरली म्हणाला की, इतर जखमी व्यक्तीची (ग्रुप कॅप्टन वरुण) ओळख पटू शकली नाही, जो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. मुरलीच्या म्हणण्यानुसार, जनरल रावत यांच्या खालच्या भागात खूप जखमा होत्या, त्यांना चादर गुंडाळून अॅम्ब्युलन्समध्ये नेण्यात आले.

बचाव कार्यात समस्या

जंगलात झालेल्या अपघातामुळे बचाव आणि मदत कर्मचार्‍यांना येथे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी वाहने नेण्याचे कोणतेही साधन नसल्याने जवळच्या नदीतून व घरांतून भांड्यांनी पाणी आणऊन टाकले जात होते. यादरम्यान एक झाड उन्मळून पडल्याने अडचणी वाढल्या. तत्पूर्वी, हवाई दलाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले होते की, "महान दु:खाने पुष्टी केली जाते की जनरल बिपिन रावत, श्रीमती मधुलिका रावत आणि अन्य 11 जणांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी