कोरोनामुळे 'या' सेलिब्रेटी शेफचा अमेरिकेत मृत्यू, मुंबईत दिली होती पार्टी

कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. या व्हायरसची लागण जगभरातल्या मोठं-मोठ्या व्यक्तींनाही झाला आहे. या व्हायरसमुळे एका सेलिब्रेटी शेफनं आपला जीव गमावला आहे.

corona virus
कोरोनामुळे 'या' सेलिब्रेटी शेफचा अमेरिकेत मृत्यू  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबईः  कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. या व्हायरसची लागण जगभरातल्या मोठं-मोठ्या व्यक्तींनाही झाला आहे. या व्हायरसमुळे एका सेलिब्रेटी शेफनं आपला जीव गमावला आहे. व्हायरसच्या इन्फेक्शनने भारतीय वंशाचे सिलेब्रिटी शेफ फ्लॉएड कार्डोज यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेत राहत असलेल्या या शेफची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

फ्लॉएड कार्डोज हे 59 वर्षाचे होते. न्यू जर्सीमध्ये राहणारे कार्डोज यांना 19 मार्चला कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा मेडिकल रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. धक्कादायक म्हणजे फ्लॉएड कार्डोज याच महिन्यात मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी एक पार्टीही दिली होती.  त्यात जवळपास 200 जण सहभागी झाले होते. अनेकांना त्यांनी पार्टीला निमंत्रित केले होते. 

कार्डोज हे 8 मार्चपर्यंत मुंबईत होते. त्यानंतर ते अमेरिकेत रवाना झाले. दरम्यान, त्यांच्या 18 मार्च रोजीच्या इन्स्टाग्राम पोस्टनुसार ते न्यू जर्सीतील रुग्णालयात दाखल झाले होते. न्यू जर्सीला परत गेल्यानंतर फ्लॉएड यांनी व्हायरल फीवर झाला होता. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर टेस्टिंगमध्ये त्यांना कोरोना व्हायरस झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे.

त्यामुळे आता त्या पार्टीत हजेरी लावणाऱ्या लोकांबाबतही संदिग्धता निर्माण होऊ शकते.  कार्डोज यांनी दिलेल्या पार्टीला गेलेल्या प्रत्येकांच्या चिंता वाढली आहे. दरम्यान, अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 773 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

फ्लॉएड कार्डोड यांचे न्यू यॉर्कमध्ये शेज फ्लॉएड, बॉम्बे कॅंटीन आणि ओ पेड्रो चे मालक होते. मुंबईसह गोव्यातही फ्लॉएड यांचे रेस्ट्रॉरन्ट आहेत.  त्यांनी मुंबई नुकतेच आपले तिसरे जॉईंट व्हेंचर ‘Bombay Sweet Shop’ सुरु केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी