PM Modi's Meeting on Corona : देशातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे केंद्र सतर्क, आज पंतप्रधान मोदी घेणार बैठक, देशात परत निर्बंध लागण्याची शक्यता

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. काल दिवसभरात तब्बल 1 लाख 59 हजार 632 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशभरातल्या कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (Narendra Modi) अध्यक्षतेखाली दुपारी साडेचार वाजता महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

PM Modi's Meeting on Corona
कोरोना रुग्णांमुळे केंद्र सतर्क; पंतप्रधान मोदी घेणार बैठक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • काल दिवसभरात तब्बल 1 लाख 59 हजार 632 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
  • गेल्या 4-5 दिवसांत, कोरोनाच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ
  • एका दिवसात देशात 5-10 लाख रुग्ण येऊ शकतात.

नवी दिल्‍ली : कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. काल दिवसभरात तब्बल 1 लाख 59 हजार 632 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशभरातल्या कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (Narendra Modi) अध्यक्षतेखाली दुपारी साडेचार वाजता महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीनंतर केंद्रीय पातळीवर कोणते निर्णय घेतले जातात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि  केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया (Mansukh Mandaviya) देखील सहभागी होणार आहेत. दरम्यान अशाप्रकारच्या बैठकीत दोन-तीन वेळा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरही पंतप्रधानांनी पावले उचलली आहेत. 

गेल्या 4-5 दिवसांत, कोरोनाच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे आणि त्यांची सध्याची संख्या आता 1.5 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या वर्षी, जेव्हा कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराने देशात साथीचा रोग निर्माण केला होता, तेव्हा एप्रिलमध्ये अशा प्रकारे प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. यंदा त्याचे उग्र रूप जानेवारीतच पाहायला मिळत आहे. 

आज होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीला पीएम मोदींच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकाऱ्यांसह तज्ज्ञही उपस्थित राहणार आहेत, जे त्यांना याबाबत अवगत करतील. येथे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की तामिळनाडूमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता तेथे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. एका दिवसात देशात 5-10 लाख रुग्ण येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोना महामारीचे जे स्वरूप भारतात दिसत आहे ते अमेरिका आणि युरोपातील इतर देशांमध्येही कमी-अधिक प्रमाणात दिसून येत आहे. अमेरिकेबद्दलच बोलायचे झाले तर, आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक 10 लाख रुग्ण आढळले आहेत. तर फ्रान्स, इटली आणि ब्रिटनसह इतर देशांमध्ये, यावेळी महामारीनंतर सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनमुळे रुग्ण संख्या वाढली आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी