Ola & Uber : नवी दिल्ली : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) ने ‘ओला’ आणि ‘उबर’ या दोन्ही ऑनलाईन टॅक्सी सेवा प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या कंपन्यांना व्यवसायात गैरव्यवहार करणे तसेच, ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.
राष्ट्रीय, ग्राहक हेल्पलाईन (NCH) कडे मिळालेल्या माहितीनुसार, एक एप्रिल 2021 ते एक मे 2022 या एका वर्षाच्या काळात, ग्राहकांनी ‘ओला’ सेवेविरुद्ध 2,482 तक्रारी आणि ‘उबर’ विरोधात, 770 तक्रारी नोंदवल्या आहेत.
गेल्या आठवड्यात, या विभागाने, वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्या- ओला, उबर, रॅपिडो, मेरू कॅब्स आणि जुगनू अशा सर्व सेवांच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत त्यांना, राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन चे भागीदार व्हावे असे निर्देश दिले होते, यामुळे, ग्राहकांना उत्तम दर्जाची तक्रार निवारण सेवा उपलब्ध होईल आणि ग्राहक संरक्षण कायदा, 2019 तसेच ई-कॉमर्स अधिनियमांचे अनुपालनही करता येईल.
सीसीपीए कडून, आयएसआय चिन्हाशिवाय विकल्या जाणाऱ्या आणि बीआयएस मानकांचे उल्लंघन करणाऱ्या वस्तू खरेदी न करण्याबाबत ग्राहकांनाही सावधगिरी आणि सुरक्षाविषयक सूचना जारी करण्यात आल्या. 6-12-2021 रोजी हेल्मेट, प्रेशर कुकर आणि स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर यांच्या संदर्भात पहिली नोटिस जारी करण्यात आली होती तर 16-12-2021 रोजी इमर्शन वॉटर हीटर, शिवण यंत्र, मायक्रोवेव ओव्हन, एलपीजीसहित स्थानिक गॅस स्टोव्ह इत्यादींसंदर्भात दुसरी नोटिस जारी केली होती.