New CDS | सरकारने सुरू केली नव्या सीडीएसची नियुक्ती प्रक्रिया, जनरल नरवणे सर्वात मोठे दावेदार

Process for appointment of new CDS | संरक्षण मंत्रालयाने (Defence ministry) अंतर्गत सल्ला मसलत केल्यानंतर शुक्रवारी या आवश्यक आणि महत्त्वाच्या प्रक्रियेची सुरूवात केली. या प्रक्रियेअंतर्गत पुढील टप्प्यात नव्या सीडीएससाठी संभावित नावांचे पॅनल तयार केले जाण्याचे वृत्त आहे. संभावित उमेदवारांचे पॅनल तयार झाल्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षता असणारी कॅबिनेटची नियुक्तीसाठीची समिती नव्या सीडीएसच्या निवडीवर अंतिम निर्णय घेणार आहे.

appointment process of new CDS
नव्या सीडीएसची नियुक्ती प्रक्रिया 
थोडं पण कामाचं
  • जनरल बिपिन रावत यांच्या दुदैवी निधनानंतर नव्या सीडीएसची होणार नियुक्ती
  • सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे प्रमुख दावेदार
  • तिन्ही सैन्यदलांमध्ये समन्वय साधण्यासाठी सीडीएस या नव्या पदाची निर्मिती

Process for new CDS | नवी दिल्ली : केंद्र सरकारने जनरल बिपिन रावत (General Bipin Rawat) यांच्या दुर्दैवी निधनानंतर देशाच्या नव्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएसच्या (CDS)नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्रालयाने (Defence ministry) अंतर्गत सल्ला मसलत केल्यानंतर शुक्रवारी या आवश्यक आणि महत्त्वाच्या प्रक्रियेची सुरूवात केली. या प्रक्रियेअंतर्गत  पुढील टप्प्यात नव्या सीडीएससाठी संभावित नावांचे पॅनल तयार केले जाण्याचे वृत्त आहे. (Central government started the appointment process of new CDS)

नव्या सीडीएसच्या नियुक्तीची प्रक्रिया

सूत्रांकडून अशी माहिती समोर येते आहे की संभावित उमेदवारांचे पॅनल तयार झाल्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षता असणारी कॅबिनेटची नियुक्तीसाठीची समिती नव्या सीडीएसच्या निवडीवर अंतिम निर्णय घेणार आहे. अद्याप हे स्पष्ट नाही की तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांमधूनच नवा सीडीएस नियुक्त केला जाणार आहे की अलीकडेच निवृत्त झालेल्या एखाद्या सैन्य प्रमुखालादेखील सीडीएस बनवले जाऊ शकते. मात्र ज्या पद्धतीने तिन्ही सेनादलांमध्ये समन्वय साधण्यासाठी सीडीएस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने वेगळा मिलिटरी अफेअर्स विभाग स्थापन केला होता ते पाहता एखाद्या निवृत्त सैन्य प्रमुखाची या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता तशी कमीच आहे. सीडीएस पदावर असणारी व्यक्तीच नव्या मिलिटरी अफेअर्स विभागाचे सचिवदेखील असतात.

जनरल मनोज नरवणे पाच महिन्यात होणार निवृत्त

जनरल मनोज नरवणे हे सध्या भारताचे लष्करप्रमुख आहेत. तिन्ही सैन्यदलांच्या सध्याच्या सैन्य प्रमुखांमध्ये जनरल रावत यांचे उत्तराधिकारी म्हणून जनरल नरवणे हेच सर्वात प्रबळ दावेदार आहेत. तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांमध्ये जनरल नरवणे हेच सर्वात वरिष्ठ आहेत. जनरल रावत यांच्याकडून जनरल नरवणे यांनी ३१ डिसेंबर २०१९ला लष्करप्रमुखाची सूत्रे हाती घेतली होती. आगामी एप्रिल महिन्यात म्हणजेच पाच महिन्यांनी ते निवृत्त होणार आहेत. वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी ३० सप्टेंबरला तर नौदलप्रमुख अॅडमिरल आर हरिकुमार यांनी आताच ३० नोव्हेंबरला नौदलाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यामुळे अनुभव आणि सद्यपरिस्थितीत सीमेवर असलेली आव्हाने लक्षात घेता जनरल नरवणे यांचीच नियुक्ती नवे सीडीएस म्हणून होण्याची शक्यता अधिक आहे. लडाखमध्ये चीनी सैन्याबरोबरच्या तणावाला जनरल नरवणे यांनी परिपक्वपणे हाताळले आहे.

भारताचे सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे देशाचे २८वे लष्करप्रमुख आहेत. ते सातव्या शीख लाइट इन्फ्रंट्रीमध्ये १९८० मध्ये भरती झाले होते. कारगिल युद्धाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. लष्करप्रमुख होण्याआधी ते लष्कराचे उपप्रमुख होते. लष्कराच्या पूर्व विभागाचे (इस्टर्न कमांड) कमांडर म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. तसेच त्यांनी लष्कराच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुखपद प्रभावीरित्या हाताळले आहे.

हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेल्या सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर स्क्वेअर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांच्या दोन्ही मुलींनी आपल्या आई वडिलांना मुखाग्नी दिली. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी